गुरुकुल करिअर अकॅडमी द्वारे मुंबई पोलीस सेवेत आणि BSF मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार
MKM NEWS 24-
सडक अर्जुनी – खूप कमी कालावधीत येशाचे शिखर गाटनाऱ्या आणि मुलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुकुल करिअर अकॅडमी सडक अर्जुनी चे वतीने आज रविवार दी. 24 सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस दलात आणि BSF मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
सविस्तर असे की, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका येथील गुरुकुल करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक राजेश शेंडे यांच्या वाढदिनाच्या औचित्य साधून अकॅडमी द्वारे मुंबई पोलीस सेवेत मध्ये निवड झालेल्या कु. रुपाली भिवगडे, कु. आयूशी कोटांगले तसेच सीमा सुरक्षा बल मध्ये निवड झालेले मेघनाथ लटये यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाचे अध्यक्ष स्थानी सकाळ चे पत्रकार आर.व्ही.मेश्राम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून MKM न्यूज 24 चे संपादक डॉ. सुशील लाडे, निशांत राऊत , शाहिद पटेल पत्रकार नवभारत, बिरला गणवीर पत्रकार देशोन्नती, सौ. सुषमा राजेश शेंडे संचालिका गुरुकुल करिअर अकॅडमी ह्या होत्या.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश शेंडे यांनी केले त्यात ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षात अकॅडमी ची झालेली प्रगती,वाटचाल आणि अकॅडमी च्या माध्यमातून 17 विद्यार्थी चे यसाचे शिखर, प्रवास, यश संपादन बदल त्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये माहिती दिली.
कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी यश संपादन करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. त्यात जिद्द, चिकाटी, परिश्रम, लक्ष, वेळेचे नियोजन अशा अनेक विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यात डॉ. सुशील लाडे म्हणाले की, आपल्याला पोजिशन पॉवर आणि पर्सनल पॉवर पाहिजे असेल तर मेहनत करणे आवश्यक आहे. आणि ते पॉवर आपल्याला शिक्षणा वीणा मिळणे अशक्य आहे कारण आपण सर्व साधारण घरचे आहोत. शिक्षण हा एकमेव उपाय आहे आपल्याला यशस्वी होण्यासाठी . आपल्या आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा फळ नक्की मिळेल.
मंचकावर असलेल्या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अकॅडमी चे संचालिका सौ.सुषमा राजेश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वीरीत्या होण्यासाठी अकॅडमी चे सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.