सडक अर्जुनी तालुक्यात पहिल्यांदाच फार्मसिस्ट दिवस साजरा
MKM NEWS 24- संपादक -डॉ. सुशिल लाडे
सडक अर्जुनी – 26/9/2023- सडक अर्जुनी तालुका औषधी विक्रेता संघाच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर रोज मंगळवार ला सडक अर्जुनी तालुक्यात पहिल्यांदाच फार्मसिस्ट दिवस हा केक कापून साजरा करण्यात आला. सविस्तर असे की,25 सप्टेंबर दिवस हा जागतिक फॉर्मोसिस्ट दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. नेमके म्हणजे सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे सडक अर्जुनी तालुका औषधी विक्रेता संघ च्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर रोज मंगळवार ला सडक अर्जुनी तालुक्यात पहिल्यांदाच फार्मसिस्ट दिवस हा केक कापून साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या संघाच्या वतीने मंचकावर विराजमान झालेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आपल्या जीवनात जीवनभर फॉर्मोसिस्ट ची सेवा देणारे सिनियर फॉर्मोसिस्ट म्हणून जाकिर अली जी, शाम भाऊ येवले जी, यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष उत्पल शर्मा हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डूग्गिपार ठाण्याचे ठाणेदार आर. सिंगनजुळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तेजराम मडावी नगराध्यक्ष न. प. सडक अर्जुनी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव कोरे, डॉ.प्रभाकर गहाने, डॉ.रोशन देशमुख, डॉ. लंजे, डॉ. कठाने, डॉ. आरसोडे, डॉ.महेश गिऱ्हेपूंजे , सिनियर औषधी विक्रेता म्हणून सत्कार मूर्ती जाकिर अली जी, शाम भाऊ येवलेजी, तसेच पत्रकार म्हणून संपादक – डॉ.सुशील लाडे , शाहिद पटेल , बिरला गणवीर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष उत्कल शर्मा यांनी केले असता त्यांनी फॉर्मोसिस्ट च्या जीवन कार्याबद्दल प्रकाश टाकत कशा प्रकारे एक औषधी विक्रेता किती तरी ताश सेवा देत असतो. तर कोरोणा महामारीच्या काळात तर तो प्रत्यक्ष संपर्कात येत असून दिवशभर सेवा देत होता असे म्हणाले .तसेच मंचकावर उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजनांमध्ये सर्वच औषधी विक्रेता यांनी मोलाचे सहकार्य केले त्यात या संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून छगन कापगते, शाम् भाऊ येवले , संदीप राऊत, तापेश काशिवार , शरद रहीले, प्रमोद गिरहेपूंजे, अरविंद कोरे, ओमप्रकाश लाडे, धर्मेंद्र कटरे, नरेंद्र सरकार, गुड्डू भाई, प्रियंक उजवने, आणि संपूर्ण औषधी विक्रेता दुकानदार यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन हर्षल निर्वाण तर आभार प्रदर्शन प्रमोद गिरहेपुंजे यांनी केले.