Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

पत्रकारांचे RFO ला निवेदन – पत्रकारांच्या बाबतीत केलेल्या त्या तक्रार पत्राचा खुलासा करा !

सडक अर्जुनी  दि. 20 ऑक्टोंबर 2023 : सडक/अर्जुनी तालुक्यातील पत्रकारांची लेखी तक्रार वनपरिक्षेत्रातील अधिकारी वनकर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी केली त्या तक्रारीचा खुलासा करावा या करीता तालुक्यातील सर्वच पत्रकार एकत्र येत लेखी स्वरूपाचे निवेदन 19 ऑक्टोंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांनी दिला आहे. खुलासा न केल्यास केलेली तक्रार खोटी समजण्यात येईल आणि वरिष्ठांकडे आपली तक्रार करण्यात येईल असे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की : सडक/अर्जुनी तालुक्यातील सर्व पत्रकारांची लेखी तक्रार वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचेकडे केली आहे. त्या तक्रारीत परिसरातील वन अधिकारी आणि कर्मचा-यांच्या सह्या घेऊन पत्रकार माध्यमावर खोट्या तक्रारी करणे, वृत्तपत्रावर व प्रसार माध्यमावर खोट्या बातम्या प्रसारीत करुण वनकर्मचा-यांवर दबाव निर्माण करणे, धमकावणे, व आर्थिक शोषण करणे, असे प्रकार वारवार होत असुन त्याचे परिणाम वनकर्मचा-यांच्या कामावर, कुटुंबावर व सार्वजनिक आयुष्यावर होत आहे.

त्यामुळे त्यांची मानसिकता ढासळलेली आहे. असे तक्रारीत नमुद केले आहे. अशा प्रकारची पत्रकारांसदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-याकडे तक्रार केली आहे. त्या अनुसंगाने सडक/अर्जुनी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी दि. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी एकत्र येहून असा निर्णय घेतला कि, ज्या अधिकारी व वनकर्मचारी यांनी पत्रकारांसदर्भात तक्रार केली मात्र असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

की त्यांना कोणत्या पत्रकारांनी त्रास दिला किंवा त्यांच्या खोट्या तक्रारी केल्या त्या पत्रकारांच्या नावाचा पुराव्यासह स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, सर्वच पत्रकारांना त्याच्यात गोवण्यात येऊ नये. त्यांची आपण स्पष्ट तक्रार करावी. अशा पत्रकारांचा खुलासा आपण सादर करावा, अन्यथा सर्वच पत्राकाराच्या संदर्भात केलेली तक्रार ही खोटी समजण्यात येईल. व त्या अनुसंगाने आपल्या विरोधात वरिष्ठ आधिका-यांकडे तक्रार करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी. असे लेखी निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव सडक/अर्जुनी यांना देण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित पत्रकार यांनी तालुक्यातील विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा केल्या या प्रसंगी प्रा.डॉ. राजकुमार भगत,       मुख्य संपादक – डॉ. सुशिल लाडे , भामा चु-हे, आर. व्ही. मेश्राम, राजेश मुनिश्वर, बिरला गणवीर, मुख्य संपादक : बबलु मारवाडे, ओमप्रकाश टेंभुर्णे, एल. के. चंदेल, प्रभाकर भेंडारकर, चंद्रमुणी बन्सोड, शाहिद पटेल, जितेंद्र चन्ने, वामन लांजेवार, सुधीर शिवनकर, अरुण बिसेन, राधेश्याम कवरे, युवराज वालदे उपस्थीत होते दरम्यान प्रतीलीपी वनसंरक्षक प्रादेशिक नागपुर, उपवनसंरक्षक गोंदिया, प्रधान मुख्य वनसंरक्षक महा. राज्य नागपुर यांना पत्र देण्यात आले आहे.

error: Content is protected !!