Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

अवैध वृक्षतोड प्रकरणी अखेर RFO सुरेश जाधव निलंबित

तालुक्यातील सर्वच पत्रकार खोट्या बातम्या लावतात, त्रास देतात, अशी केली होती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनकडे लेखी तक्रार

सडक अर्जुनी, दि. 22 ऑक्टोंबर 2023 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव व शेंडा क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक एफ.एस. पठाण यांच्यावर नुकतीच अवैध वृक्षतोड प्रकरणी – चौकशीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या बातमी मुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जयरामगौड़ा आर. व नागपूर प्रादेशिक कार्यालयाने २० ऑक्टोबर रोजी केली आहे.

लोकमत या वृत्त पत्राने आज प्रकाशित केलेल्या वृता नुसार… सात आठ महिन्यांपूर्वी सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे शेंडा सह वन क्षेत्रातील वन कक्ष क्रमांक ६७६ (संरक्षित वन) १७२ (राखीव वन) ६८८, ७०३, ६८१ व ६७१ ( संरक्षित वन) मध्ये टप्याटप्याने एकूण ४५ वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. या वृक्षांची किंमत ४ लाख ८ हजार २०० रुपये आहे, तर यापैकी १६ नग म्हणजे ५४ हजार ६९१ रुपयांचे लाकूड वन परिक्षेत्र अधिकारी जाधव, क्षेत्रसहायक एस.एफ. पठाण यांनी जप्त केले होते. पण या प्रकरणात वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत व एकूण वृक्षतोड केलेला पूर्ण लाकूडफाटा जप्त न केल्याचा त्यांच्यावर ठपका होता. यात शासनाचे ३ लाख ५३ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणाची काही गावकऱ्यांनी तक्रार देखील केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वन विभागाने चौकशी केली. चौकशीत ही बाब स्पष्ट झाल्याने उपवनसंरक्षक जयरामगौडा आर. यांनी शुक्रवारी (दि.२०) रोजी सडक अर्जुनीचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव व क्षेत्रसहाय्यक एस.एफ. पठाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत दोघांनी मुख्यालय उपवनसंरक्षक गोंदिया येथे कार्यरत राहावे लागणार आहे.

तर सडक अर्जुनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कारभार डोंगरगाव आगाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहे. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून जंगलातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणाची चर्चा सुरू होती. याची काही गावकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार सुद्धा केली होती.

त्याच अनुषंगाने वन विभागाने या प्रकरणाची चौकशी केली, त्यात अवैध वृक्षतोड झाल्याचे सिद्ध झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आणि क्षेत्रसहाय्यकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर याच प्रकरणात सहभागी असणाऱ्या पुन्हा दोन अधि-काऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याची माहिती लोकमत वृत्तपत्राने प्रकाशित करीत दिली आहे. त्यामुळे या कारवाईकडे सडक अर्जुनी तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. की ते दोन अधिकारी कोण ?

वन विभागाच्या जागेतून अवैध रित्या लाकूड कापून चोरीचे प्रमाण तालुक्यात सातत्याने वाढले होते. तर वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या नदी व नाल्यातून वाळूचा विना परवाना उपसा केला जात होता. यावर तालुक्यातील पत्रकारांनी सातत्याने बातम्या प्रकाशित करून सदर प्रकरण उजेडात आणल्यामुळे मलाई खाणे बंद होणार या भीती पोटी तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी निवेदन दिले. तालुक्यातील सर्वच पत्रकार खोट्या बातम्या लावतात. आणि नाहक त्रास देतात त्या मुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब होत असल्याची खोटी तक्रार वरिष्ठांना केली होती.

त्या तक्रारीचा खुलासा द्यावा या करीता तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत लेखी निवेदन 20 ऑक्टोंबर रोजी आरएफओ सुरेश जाधव यांना दिले होते.

मात्र दुशऱ्या दिवसी झालेल्या कारवाई मुळे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली तक्रार ही खोटी होती असे सिद्ध झाले आहे. आर.एफ.ओ. सुरेश जाधव यांच्यावर झालेल्या कारवाई मुळे आता तरी वन विभागाच्या जागेतून होणाऱ्या चोऱ्या थांबणार का ? असा सवाल तालुक्यातील जनतेला पडला आहे.

error: Content is protected !!