सौंदड येथे 51 फूट रावण दहन कार्यक्रमाला अफाट गर्दी
सडक अर्जुनी – भारतात विविध ठिकाणी दसरा सन उत्साहात साजरा केला जातो . या दसरा सन निमित्ताने ग्राम सौंदड येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत सौंदड व श्री. गूरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी संपन्न झालेला दसरा हा सौंदड वासीयांसाठी एतीहासिकच ठरला आहे. सौंदड चे युवा सरपंच हर्ष मोदी यांनी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात केले होते.
दसरा सणा निमित्ताने 51 फूटी रावणाचे प्रतिकारक पुतळ्याची निर्मिती करण्यात आली होती. तर गावातील आजी माजी पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. विशेष म्हणजे गावकऱ्यांना व आलेल्या पाहुण्याना बसन्याची सोय केली होती. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे पोशाक घालून मुलांना तय्यार करण्यात आले होते.
तर गावतील दुर्गा मंदिर पासून ते हिरबाजी स्टेडियम पर्यन्त पैदल सोभा यात्रा काढण्यात आली होती. सोन्याचे झाड लावण्यात आले होते. कुस्ती चा कार्यक्रम पाहन्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.
रामायन लघु नाटिका या ठिकाणी नाटकाच्या स्वरूपात दाखविण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, रावणाचे दहन, झाल्याननंतर डिजेच्या तालावर गावकरी थिरकले. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमेच्या स्वरूपात अशलेल्या तेलचित्रांची पूजा करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. तर जिल्हा परिषद सदश्य निशा तोडासे, वर्षा शाहारे पंचायत समिति सदश्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच हर्ष मोदी, विशेष पाहुणे उपसरपंच भावराव यावलकर, संदीप मोदी अध्यक्ष व्यापारी संघटन सौंदड, भाजप चे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये मंचावर उपस्थित होते.
रावण दहन वेळी काही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. तर अॅबुलेनस सह फायर ब्रिगेड चे वाहन यावेळी उपस्थित होते. यावेळी सत्कार मूर्ती माजी.जी. प. सदस्य अशोक लंजे, माजी.जी. प.सदस्या रूपाली ताई टेंभूरणे, माजी. जी. प.सदस्य रमेश चूऱ्हे, जी. प.सदस्य निशा तोडासे, माजी पंचायत समिति सदश्या मंजू डोंगरवार, प.स.सदस्या वर्षा शाहारे, माजी सरपंच राजेंद्र गुबरेले, चरणदास शाहारे, हितेश लवंगाणी, प्रभूदयाल लोहिया, पोलीश पाटील वैध व अन्य उपस्थित होते.
मंचावरून हर्ष मोदी यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले ते म्हणाले की मी जो पर्यन्त जीवंत राहणार तो पर्यन्त सौंदड गावात या प्रमाणे रावण दहन करणार आहे. गावात धर्म आणि जातीच्या नावाणे राजकारण केले जाते ते आपल्याला हे संपवायच आहे. आणि गावाचा विकास करायच आहे. गावात भेद भाव आणि राजकारण करन्यासाठी मी सरपंच झालो नाही. मी कुठल्याही पक्षाचा नाही मी गावचा सरपंच आहे. हे सर्वानी लक्ष्यात घ्यावे. सरपंच आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही प्रतेकाच्या घरी जाऊन राबवित आहोत. शासनाची प्रत्येक योजनेचा लाभ कशा प्रकारे नागरिकांना मिळवून देता येइल याचे सूक्ष्म नियोजन ग्रामपंचायत करीत आहे.