Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

आज गौतमी पाटील यांचे लावणीचे कार्यक्रम सडक अर्जुनी मध्ये

लावणी चे कार्यक्रम पाहण्यासाठी तरूणांमध्ये मोठी उत्सुकता वाढली आहे. प्रसिध्द लावणी नृत्य करणारी गौतमी पाटील यांना यूट्यब वर अनेकांनी पाहिलं आहे. मात्र आता पहिल्यांदाच प्रतेक्षात गोंदिया जिल्हा वासियांना त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मिळणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि चंद्रिकापुरे मित्र परिवाराच्या वतीने दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजिन दी. 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता मनोरंजनाचे कार्यक्रम नृत्तिका लावणी फेम गौतमी पाटील यांच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी उसळणार असल्यामुळे आयोजकांनी दोन दिवसा पासून जय्यत तयारी केली आहे. कार्यक्रम शांतता व सुव्यवस्थेत पार पडावे यासाठी आयोजकांसह पोलिस प्रशासन कामाला लागले आहे.

लावणी फेम गौतमी पाटील यांचे जिल्ह्यात पहिल्यादाच आगमन होत आहे. आज 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली आहे. त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

error: Content is protected !!