लोककलेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा:-जि.प.उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणविर
सडक अर्जुनी –दिनांक २४/११/२०२३ रोज शुक्रवारला मौजा मनेरी येथे साईबाबा नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित भाकर या तीन अंकी नाटकाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज आपल्या मंडळाने सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला.
पुर्वीच्या काळात नाटक,दंडार,तमाशा,लावणी अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोककला जिवंत होती.परंतु आज या लोककला लोप पावत आहेत.तुमच्या मंडळाच्या वतीने लोककला टिकविण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्याकरीता आपल्या मंडळाचे मनःपूर्वक धन्यवाद.लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन होते.आणि ते आत्मसात करून घ्यावे अशाप्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, मधुसूदन दोनोडे,गिरिधर हत्तीमारे,नाशिकाताई लांजेवार,क्रिष्णाताई कोरे, माधुरीताई कोरे, अर्जुन घरोटे, राकेश कोरे,शुभांगीताई राउत,अल्काताई पाऊलझगडे तथा सर्व गावकरी उपस्थित होते.