Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

रुग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा :- जि.प.उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर

अर्जुनी मोरगाव – दिनांक ०५/१२/२०२३ रोज मंगळवार ला प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व पवनी धाबे येथे जन आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी दोन्ही आरोग्य केंद्रातील ओपीडी,औषध साठा,बाह्य रुग्ण व आंतररुग्ण , आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,जमा खर्च अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या, भौतिक व मुलभूत सुविधा या विषयावर सुद्धा चर्चा केली.
यावेळी इंजि गणविर म्हणाले की,आपला हा भाग अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील क्षेत्र आहे आणि योग्य उपचार व मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य आहे असे समजून प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने रुग्णांची सेवा करावी.आपल्या आरोग्य केंद्रात गोरगरीब, शेतकरी व शेतमजुर उपचार घेण्यासाठी येतात त्यांचा उपचार करत असताना कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता.कारण रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विजय राऊत,पंचायत समिती सदस्या आम्रपाली डोंगरवार, रतिराम राणे,विनोद किरसान, रवींद्र घरतकर, कृष्णा मांडवे, हर्षा राऊत, तुलशिदास कोडापे, डॉ देवेंद्र घरतकर, डॉ मोनाली दरेकर, पवनी धाबे येथे पपिता नंदेश्वर, बळीराम टेंभुर्णे, करणदास रक्षा, रवींद्र नाईक, रामसिंग सहाळा, जागेश्वर मते,कलिराम काटेंगे, भिमराव नंदेश्वर, ताराचंद ठवरे, पुरुषोत्तम कोरे, डॉ प्रवीण दखने, डॉ भुषण मेंढे तथा सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!