आमदार चंद्रिकापुरें च्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न
सडक अर्जुनी – दिनांक ५/१२/२३ ला सकाळी ९ वाजेपासून माननीय आमदार मनोहर जी चंद्रिकापुरे साहेब यांच्या शुभहस्ते कोसमतोंडी थाडेझरी. मुरपार चिचटोला घटेगाव हेटी या गावांमध्ये आमदार साहेबांच्या सहकार्याने मंजूर असलेल्या कामाचे भूमिपूजन व काही ठिकाणी लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोसमतोंडी येथे नरहरी सोनार यांच्या सभामंडप बांधकाम चे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधाताई राहांगडाले पंचायत समिती सदस्य निशा काशीवार सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य श्रीमती रजनीताई गिरीपुंजे डॉक्टर अविनाश काशिवार डीयू राहंगडाले सुधाकर पंधरे यशवंत धुर्वे व संपूर्ण गावचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक व जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते