जि.प.शाळा मोरगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन व क्रीडा उत्सव
अर्जुनी/मोर.- जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,मोरगाव येथे दि.८,९ व १० डिसेंबरला तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर, स्नेह संमेलन विदयार्थ्यांच्या ज्ञानाबरोबर त्यांच्या सुप्त क्षमता व सृजनशीलता विकसित करण्यासाठी एकांकिका, लघुनाट्य, , लोकनृत्य,, मुकनाट्य, एकपात्री प्रयोग, फॅशन शो, गितगायन स्पर्धा, विविध मैदानी स्पर्धा आदीचे सादरीकरण करण्यात येणार आहे .
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती यशवंत गणवीर तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद करण्याचे आवाहन मुख्याध्यापक रेखा गोंडाने यांनी केले.