Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

महिलांना सक्षम करण्यासाठीच प्रयत्न करणार ना. आदितीताई तटकरे

सडक अर्जुनी – MKM NEWS 24- आज सर्वच क्षेत्रात महिला पुढाकार घेत आहेत. स्वतःच्या कुटुंब कशाप्रकारे सांभाळायचं याची जाणीव बऱ्याच महिलांना झाली आहे. त्यामुळेच महिला आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी बचतीकडे वळले आहेत. परंतु अल्पबचतीमुळे त्यांची आर्थिक गरज पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे महिलांना अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठीच आपण प्रयत्न करणार.

असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितिताई तटकरे यांनी व्यक्त केले. सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मंचावर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महासचिव राजेंद्र जैन , राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रेम भाऊ रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर महिलाअध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जि प उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जी प सदस्य सुधाताई रहांगडाले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!