Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

ग्रामरोजगार सेवकांच्या कामबंद आंदोलन व साखळी उपोषणाला माजी मंत्री राजकुमार बडोले यांची भेट

अर्जुनी-मोर, 29 डिसेंबर : येथील ग्रामरोजगार सेवकांच्या २७ डिसेंबर पासुन कामबंद आंदोलन व साखळी उपोषणाला माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी 28 डिसेंबर रोजी भेट दिली. या ठिकाणी अर्जुनी मोर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक आपल्या मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या 2016 – 17 पासून 2023 – 24 पर्यंतचा आठ वर्षाचा प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता 81 लक्ष रुपये अजून पर्यंत शासनाने अदा केले नाही.

याबाबत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी खंड विकास अधिकारी यांच्याकडे आढावा घेतला असता शासनाने मग्ररोहयोच्या एकूण खर्चाच्या सहा टक्के निधी सोयीसुविधांवर खर्च करणे अपेक्षित असते त्यापैकी जवळपास अडीच टक्के खर्च हा ग्रामरोजगार सेवकांच्या पगार व प्रवास भत्ता इत्यादीवर खर्च करणे अपेक्षित आहे मागील आठ वर्षात अर्जुनी मोर तालुक्यात मग्रारोहयोंवर साधारणता 81 कोटी खर्च झाले आहे. परंतु त्यांचे 81 लक्ष शासनाने अनेक निवेदन देऊन अजून अदा केले नाही.

याबाबत राजकुमार बडोले यांनी त्वरित राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री वाघमारे व मग्रारोहयोचे आयुक्त अजय गुल्हाने यांच्याशी फोनवरून चर्चा केली व ग्राम रोजगार सेवकांचे प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता अदा करण्याचे त्यांना सुचविले.

सोबत जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर,पंचायत समिती सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, तालुकाध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, संदिप कापगते, गटविकास अधिकारी निमजे, संरपच संघटना तालुकाध्यक्ष भोजु लोगडे, लैलेश्वर शिवणकर, डॉ. गजानन डोंगरवार, नमुदेव नागपुरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रामटेकेसह ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!