Monday, May 12, 2025
क्राइमगोंदियासड़क अर्जुनी

सडक अर्जुनीतील शेंडा चौकात डीवायएसपीच्या विशेष पथकाने केली दारू जप्त, ९ लाख ३४ हजारांचा माल जप्त

गोंदिया / सडक अर्जुनी : पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये
अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी देवरीचे उपविभागीय
पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी विशेष पथक गठित केले. या विशेष पथकाने २७ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथील शेंडा रोडवर संशयावरून एका वाहनाची तपासणी
केली असता वाहनामधील बॉक्समध्ये अवैध दारू आढळून आली. शेंडा रोडवरवरील एका कंपनीच्या मागील बाजूला संशयितरीत्या खाकी रंगाचे बॉक्स दिसले.

वाहन चालकालावाहन थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये विदेशी दारू १८० मिलिचे १९२ पव्वे आढळून आले. याची किंमत३४ हजार ५६० रुपये असून, दारूचे बॉक्स तसे वाहन (एम.एच. ३५ ए आर १९३४) जप्त करण्यात आले. याची

एकूण किंमत ९ लाख ३४ हजार ५६० रुपये आहे.
या प्रकरणात आरोपी शीतल सुकराम उईके (४१), रा. उशीखेडा /शेंडा, ता. सडक-अर्जुनी याच्यावर डुग्गीपार पोलिसांत भादंविच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!