सौंदड वासीयांचे भीक मांगो, कंत्राटदार हटाव आंदोलन
रस्त्याचे काम रखडले : वाहतूक कोंडीने सगळेच त्रस्त

सडक अर्जुनी – 30/12/23- मागील सात आठ वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम सुरू आहे. तसेच रेल्वे उड्डाण पुलाचे.कामसुद्धा सुरू आहे. यामुळे संपूर्ण.वाहतूक सौंदड गावातील सव्हिस रस्त्याने सुरू आहे परंतु.कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोडची अवस्था
अत्यंत दयनीय झाली आहे. या सव्हिंस रोडची दुरुस्ती करण्याची मागणीअनेकदा नागरिकांनी कंत्राटदारांकडे
केली. पण, कंत्राटदाराने याची दखल घेतली नाही.
त्यामुळे सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी
शुक्रवारी (दि. २९) भीक मांगो व कंत्राटदार हटाव आंदोलन करून.याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे कंत्राटदाराने सर्व्हिस रोड तयार केला. पण, या सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे अनेकदा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.
परिणामी स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास सहन.करावा लागत आहे. या रस्त्यावर सतत
उडणाऱ्या धुळीमुळे गावातील नागरिकांना दमा, श्वसनाचे आजार होत आहे. सौंदड ग्रामपंचायत व येथील सर्व
नागरिक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत.समिती सदस्य, शेतकरी आणि समस्त व्यापारी वर्गाने यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला निवेदन देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. प्रशासनालासुद्धा निवेदन देण्यात
आले. पण, त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२९) सौंदड येथील मुख्य चौकात भीक मांगो व कंत्राटदार हटाव आंदोलन करून या समस्येकडे लक्ष वेधले. या आंदोलनात समस्त सौंदड वासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“कदाचित कंत्राटदाराकडे या सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसावे म्हणून ते या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असावे. सौंदड येथील गावकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन करून जमा झालेले पैस त्यामुळे जाणीव कंत्राटदार व प्रशासनाला व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव कंत्राटदार आणि प्रशासनाला ह्वावी त्या करिता हे आंदोलन करण्यात आले.
– हर्ष मोदी, सरपंच सौंदड”