रोशन बडोले यांच्या निवासस्थानी सावित्री बाई फुले जयंती साजरी
सडक अर्जुनी – दिनांक 3 जानेवारी 2024 ला सडक अर्जुनी येथील वार्ड क्रमांक 17 मध्ये सामाजिक कार्यकर्ता तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रोशन बडोले यांच्या घरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी सौ प्रियाताई बडोले यांनी प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून दीप प्रज्वलित केले.
या प्रसंगी उपस्थित महिलानी सावित्री मातेच्या जीवनावर टाकून आपले मनोगत व्यक्त केले.या जयंती कार्यक्रमा प्रसंगी प्रभागातील बहुजन समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
त्यात प्रामुख्याने सौ अनुसया ताई कोरे ,सौ कविताताई लांजेवार, सौ उर्मिला ताई थेर, वैशालीताई हत्तीमारे, रेखाताई शेंडे, सविताताई मेश्राम, जयश्रीताई लांजेवार ,सपना ताई नेवारे, अलकाताई आमले, सौ अर्चनाताई डोंगरवार ,माधुरी ताई कोरे, सौ मंजुषाताई फुंडे, मोनिकाताई हुकरे ,रुकमोडे ताई इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या.