Monday, August 25, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

शिक्षक म्हणजे माणस घडविणारा दुत:- जि.प. उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर

सडक अर्जुनी/गोंदिया -6/01/2024- दिनांक ०५/०१/२०२४ रोज शुक्रवार ला जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह गोंदिया येथे शि‌क्षक गौरव पुरस्कार व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी आपले उद्घाटनीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात सुमारे चार हजार शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत व जवळपास नव्वद हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. आपल्या शाळेत शिकत असलेले विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते परंतु प्रत्येकाच्या अंगात काहीतरी सुप्त गुण असतात त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व यातुनच आपण सुज्ञ,तज्ञ, शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत व सृजनशील नागरिक घडविण्याचे कार्य करावे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या विद्यालयात गोर गरीब शेतकरी व शेतमजुरांची पाल्य शिक्षण घेण्यासाठी येतात.त्यांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून आपण त्यांना घडवावे.कारण दिवसभर काम करून थकून भागून येणाऱ्या पालकांना आपल्या पाल्यांनी वर्गात काय शिकले हे विचारण्यासाठी वेळ मिळत नसतो.म्हणुन आपणच त्यांना योग्य अध्यापन त्यासोबत योग्य मार्गदर्शन करावे कारण शिक्षक हा माणसं घडवित असतो ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन सुंदर मडके घडवितो त्याप्रमाणे आपणही शेवटच्या श्वासापर्यंत सृजनशील नागरिक घडविण्याचे कार्य करावे तेव्हाच आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराचे सार्थक होईल.असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने पुजाताई अखिलेश सेठ सभापती समाज कल्याण, सविताताई पुराम सभापती महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण भगत, सुरेश हर्षे,नेहा तुरकर, अश्विनी पटले, लायकराम भेंडारकर, चतुर्भुज बिसेन,विमल कटरे,छबुताई उके,प्रितीताई कतलाम, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी माध्यमिक कादर शे शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तथा जिल्ह्यातुन आलेले शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!