Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ! माजी मंत्री राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने निःशुल्क भव्य आरोग्यशिबिर उद्या रविवारला

सडक अर्जुनी : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी माजी मंत्री राजकुमार बडोले आणि मित्रपरिवार द्वारा “निःशुल्क भव्य आरोग्यशिबिर तथा चष्मे वितरण २०२४” कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ ला सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत, एच अँड टी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथे करण्यात आले असून आरोग्य शिबिरात विदर्भातील प्रसिद्ध विविध क्षेत्रातील डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत.

शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, चर्मरोग, आर्थोपेडिक, मानसिक रोग, दंत रोग, ECG आणि शुगर तपासणी साठी टीम उपलब्ध असणार आहे. शिबिरात येतांना रुग्णांनी जुनी निदान व उपचार फाइल सोबत आणण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले असून शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

error: Content is protected !!