नगरपंचायत अर्जुनी येथे आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते 6 कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन
अर्जुनी मोरगाव – नगरपंचायत अर्जुनी मोरगाव अंतर्गत नगरपंचायत हद्दीत नागरी सुविधा सहाय्य योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये 6 कोटी निधीतून मंजूर विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे हस्ते 17 जानेवारीला करण्यात आले. नगरातील विविध प्रभागात उपलब्ध मंजूर निधीतून विकास कामे केली जाणार आहेत. यावेळी सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन ,नाली बांधकाम गट्टू लावणे, विविध ठिकाणी चावडी सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन समाज भवन, सुरक्षा भिंत ,पायऱ्याची दुरुस्ती आदी विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, उपाध्यक्ष ललिता टेंभरे, बांधकाम सभापती संजय पवार, पाणीपुरवठा सभापती दानेश साखरे, महिला बालकल्याण सभापती दीक्षा शहारे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजू घोडके नगरसेविका इंद्दू लांजेवार , संपता उपवंशी, राधेश्याम भेंडारकर, एस कुमार शहारे , सागर आरेकर, संध्या शहारे , ममता भैय्या, शीला उईके, सर्वेश भुतडा, अतुल बनसोड, दिव्या पसीने, सुषमा दामले, विजय कापगते, अभिजीत कांबळे, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.