मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक – डॉ. सुशिल लाडे, अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस बाम्हणी वर्धापन सोहळ्यात प्रतिपादन
मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक – डॉ . सुशिल लाडे
अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस बाम्हणी वर्धापन सोहळ्यात प्रतिपादन
सडक/अर्जूनी : मद्य सोडण्यासाठी मद्यपींचे कुटूंब विविध लाखों रुपये खर्च करून उपचार करतात तरीही तो मद्यपी दारूकडे वळतो पण या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमसमधे एक अनुभव आला की मनातील उच्च इच्छाशक्तीने व मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक मनात आणून या जागतिक स्तरावरील संघटनेत मद्यपींनी कायमची दारू सोडण्याची जादू करून दाखविली आहे असे प्रतिपादन संपादक डॉ. सुशिल लाडे यांनी निर्माण समुह बाम्हणी खडकी येथे रवि. ( २१ जानेवारी ) ला प्रथम वर्धापन दिनाच्या सोहळ्याला केले.
अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस निर्माण समुह बाम्हणी खडकी या समुहाला २१ जानेवारीला १ वर्ष पूर्ण केल्याबद्दल हा वर्धापन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी संपादक डॉ. सुशिल लाडे, पत्रकार शाहीद पटेल, माजी सरपंच रमेश इळपाते, आमगांवचे पवन टी, चेअरमन भिमराज हे हजर होते. आपल्या भाषणात अतिथींनी सांगितले की मद्याच्या आहारी जाऊन जीवनाचा नाश करणा-या असंख्य मद्यपींना जर ही अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस संघटनेचा साथ मिळाला नसता तर आज हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असती. आणि या विनामुल्य जागतिक स्तरावरील संघटनेचे खरंच कौतुकास्पद अभिनंदन करावे लागेल की फक्त नियमित सभेत एकमेकांचे दारूमुळे झालेले वाईट प्रसंगांचे कथन ऐकुन असंख्य दारूड्यांच्या मनावर परीणाम होऊन त्यांनी आपली दारू कायमची सोडली आहे. सदर वर्धापन सोहळ्यात संचालन गोंदियाचे अजय के यांनी केले. प्रास्ताविक गुलाब एस यांचे राहीले. या प्रथम वर्धापन सोहळ्याला निर्णय समुह सौंदडचे मंगेश बी, देवराम एम, हिवराज एस, मुकेश के, महेंद्रसिगं डी, नरेंद्र बी, प्रकाश ई, सुनील एन, साकोलीचे आशिष सी तसेच निर्माण समुह बाम्हणी खडकीचे सर्व सभासदांनी सहकार्य केले.
सदर मद्यमुक्ती जीवनाकरीता मोफत सभेसाठी संपर्क – ९७६७२५५९०२, ९५२७४८१२४८, ९७६३५३६३९३, ८८०५४५७०२२ यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.