Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

सडक अर्जुनी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय समारंभ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता करण्यात आले.

ध्वजारोहण  तहसीलदार निलेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी पंचायत समिती सडक अर्जुनी चे BDO रविकांत सानप,  इंद्रायणी गोमासे अप्पर तहसीलदार, प्रेरणा कटरे नायब तहसीलदार, प्रदीप शिंदे नायब तहसीलदार, शरद हलमारे नायब तहसीलदार, निलेश देठे निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक पोचिराम कापडे, गोडाऊन कीपर नितीन कांबळे तथा सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी परिसरातील शाळेच्या द्वारे झाकी चे आयोजन करण्यात आले होते तर त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर वेळी लाखनी येथील वाघाये मिलट्री स्कूल च्या मुलांनी ड्रील केली, नागरिकांनी तुफान हजेरी लावली होती, डूग्गीपार पोलिस स्टेशन येथील पोलिसांचा एक पथक दरम्यान उपस्थित होता, ध्वजारोहण वेळी पोलिसांच्या पथकाने मानवंदना दिली, या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रामुख्याने  तेजराम मडावी नगर अध्यक्ष नगर पंचायत सडक अर्जुनी, नगरसेवक देवचंद तरोने, डॉ. सुशील लाडे  प्रधान संपादक महाराष्ट्र का मानबिंदू , महाराष्ट्र केसरी न्यूज चे संपादक बबलु मारवाडे, पत्रकार बिरला गणवीर, पत्रकार आर. वी. मेश्राम, पत्रकार ओंमप्रकाश टेंभुर्ने, पत्रकार शाहीद पटेल, सह अन्य मान्यवर व तालुका वाशी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांसाठी तहसील कार्यालयात चहा पाण्याची व नास्त्याची सोय करण्यात आली होती.

error: Content is protected !!