Sunday, May 18, 2025
गोंदिया

प्रजीत नायर गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी

प्रजीत नायर गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी तर
विदर्भ वैधानिक मंडळाच्या सचिवपदी चिन्मय गोतमारे
गोंदिया – दीड वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून चिन्मय गोतमारे हे लाभले होते.राज्य सरकारने चिन्मय गोतमारे यांच्याकडे विदर्भ वैधानिक मंडळाच्या सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. तर त्यांच्या जागी गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून प्रजीत नायर यांची नियुक्ती केली आहे.

राज्य शासनाकडून मागील दोन दिवसांपासून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. बदल्यांच्या दुसऱ्या टप्प्यात गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे स्थानांतरण नागपूर येथील विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्य सचिव पदावर करण्यात आले. तर रिक्त झालेल्या गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. यामुळे प्रजीत नायर हे गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

error: Content is protected !!