Sunday, May 18, 2025
गोंदिया

9 फेब्रुवारी स्व.मनोहर भाई पटेल स्मृती सुवर्णपदक समारोहाची जय्यत तयारी

गोंदिया – आज गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस, भवन रेलटोली, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, श्री विनोद हरिणखेडे व यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

शिक्षा महर्षी स्वनाम धन्य नेता स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, शासकीय मेडीकल कॉलेज च्या कार्यक्रमांचे सुव्यवस्थित नियोजन व गोंदिया तालुक्यातील गाव निहाय्य बूथ कमिटीचा आढावा घेण्यात आला.

शिक्षण महर्षी, स्वनाम धन्य नेता स्व.मनोहरभाई पटेल जयंती निमित्त गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे. तसेच बहुप्रतिक्षित शासकीय मेडीकल कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन समारोह देशाचे माननीय उप राष्ट्रपती सह राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करीता माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम जरी पक्षाचा नसला तरी आमचे नेते श्री प्रफुल पटेलजी यांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आपले सहकार्य महत्वाचे राहणार आहे त्यानुषंगाने प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशी विनंती माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या बैठकीत केली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरीणखेडे, रफीक खान, गणेश बरड़े, रोमेंद्र बिसेन, धरमलाल राहंगडाले, नितिन टेंभरे, नरेश गजभिए, दिलीप डोंगरे, रविशंकर खोल्हे, मनोज बिजेवार, तिथराज नारनवरे , कान्हा बघेले, युनुष शेख, केवल राहंगडाले, राधेश्याम पटले, चैनलाल दमाहे, भाऊ लाल मेंढे, पूरण ऊके, आरिफ पठान, ताराचंद मेंढे, चिन्धु गाईधंने, लेकराम लांजेवार, संजय सौतकर, अरुण सौतकर, नितिन गनवीर, भारत पंधराम, दुलीराम भाकरे, टी एम पटले, शिवलाल, जितेंद्र बिसेन, विजय राहंगडाले, तिलक पटले, मनोहर चौहान, नागों सरकार, बावनकर, देवा कापसे, राजु गनवीर, श्रेयष खोबरागड़े, रोहित, रवि घरसेले, पवन पटले, अनिल काम्बले, भीमराव ऊके, तिलक भंडारकर, करण टेकाम, प्रीतम मोटघरे, प्रशांत मिश्रा, दीपक रिणायत, राजेश तैवड़े, सुरेश चुटे, मोहित गौतम, राजेश तीर्थकर, नाजिम खान, प्रफुल ऊके, आशीष हततिमारे, राजेश नागपुरे, योगेश अगड़े, भूमेश चंन्डे, सुरेश भीमते, राजेश रामटेके, ओमेश खरोले, योगी येडे, कपिल बावन्थड़े, कुणाल बावन्थड़े, इन्द्रराज शिवकर, देवानन्द कावड़े, गुणवंत मेश्राम, रामप्रसाद नागपुरे, संजय नेवारे, युवराज गौतम, रामू चुटे, हरिप्रसाद मरठे, छोटेलाल जमरे, मनीष न्यायकरे, सुरेंद्र रिणायत, डी यू राहंगडाले, कुलदीप गायधने, अरमान जैस्वाल, राजेश राहंगडाले, पंकज चौधरी, राजेश नागपुरे, बाबा पगरवार, बिरजुला भेलावे, राजेश जमरे, गौरव शेंडे, अविनाश महावत, भूषण हलमारे, शंकर टेंभरे, संजय राउत, गुनिराम कावड़े, सुरेश कावड़े, एफ सी पटले, एस एम कापगते सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

error: Content is protected !!