Sunday, May 18, 2025
गोंदिया

शिक्षण महर्षी स्व.मनोहर भाई पटेल जयंती निम्मित विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न


गोंदिया : जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती निमित्त्य गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा, शेतकऱ्यांचा तसेच पत्रकारांचा सत्कार आज ११ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आला.

स्व मनोहर भाई पटेल यांनी गोंदिया भंडारा जिल्याच्या विकासा साठी एकाच दिवशी २२ शाळा उघडल्या आणि जिल्हा परिषदेला दान केल्या त्या नंतर दोन्ही जिल्यात शेकडो शाळा महाविद्यालय उघडले असल्याने.

गोंदिया जिल्ह्यातील विद्यर्थ्यांना शिक्षणा करिता इतर ठिकाणी जावे लागत नाही. यामुळे त्यांच्या स्मृती निमित्त दरवर्षी. गोंदिया भंडारा जिल्यातिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असून या वर्षी गोंदिया भंडारा जिल्यातील १४ गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा तसेच इलेट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तर या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना खा. प्रफुल पटेल यांनी स्व: मनोहर भाई पटेल यांच्या कार्याची माहिती दिली.

तर या कार्यक्रमाला आलेले मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील स्व: मनोहर भाई पटेल यांनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रशंसा केली.

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून म्हणाले की माणूस कसा जगला किती जगला यापेक्षा तो कुन्हासाठी जगला हा महत्वाचा आहे.

या वेळी प्रफुल पटेल म्हणाले की मुख्य मंत्री गोंदियात आले आहे. तर गोंदियाला काहीतरी देऊन जातील अशी मागणी सिंदे यांच्या कडे केली. असता मुख्य मंत्र्यांनी गोंदिया नगर परिषदे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या मनोहर भाई पटेल सभागृहाच्या बांधकामा करिता 30 कोटी रुपयांची घोषण करत आम्ही देणारे सरकार आहोत घेणारे नाही. असा टोलाही मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

तर या सुवर्ण पदक वितरण सोहळ्याला उप राष्ट्रपती जगदिप धनखड, राज्याचे राज्यपाल रमेश बेस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री धर्मराव बाबा अत्राम, खा : श्रीकांत शिंदे, खा : सी.एम.रमेश, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार शहसराम कोरोटे, आमदार राजू कारेमोरे, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री परिनय दादा फुके, जी.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले सह अनेक नेते व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

error: Content is protected !!