Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोरसड़क अर्जुनी

आपल्या हक्काचा माणूस डॉ सुगत चंद्रिकापुरे यांच्या सह नगरसेवकांची राष्ट्रवादीत घर वापसी

अर्जुनी मोरगाव/ सडक अर्जुनी – अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र ज्यांना जनमानसांत आपल्या हक्काचा माणूस म्हणून मोठीं ओळख निर्माण केली असे सर्वांचे सुपरिचित डॉ सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सडक अर्जुनी येथील 07 व अर्जुनी मोरगाव येथील 03 नगरसेवकांसह कोहमारा येथील पक्ष कार्यालयात एरिया 51 येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गुरुवारी ( दिनांक २२) ला प्रवेश करीत घर वापसी केली.

या पक्ष प्रवेश सोहळ्याचे मुहूर्त ठरविण्यात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. उल्लेखनीय असे कि, २६ मे २०२३ रोजी डॉ सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला होता. त्या पक्ष प्रवेशानंतर डॉ सुगत हे आपल्या हक्काचा माणूस असे बॅनर वर लिहीत असत. डॉ सुगत हे आपल्या हक्काचा माणूस ह्याच नावाने खूप लवकर परिसरात प्रसिद्ध झाले हे विशेष .

डॉ सुगत मनोहर चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी चे नगराध्यक्षांसह इतर १३ नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेत गेले होते. अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी घर वापसी केली आहे. गुरुवारी कोहमारा येथील एरिया ५१ येथे झालेल्या हा प्रवेश माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राकाचे प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर, राकाचे सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेवक दानेश साखरे यांचे उपस्थितीत अर्जुनी मोरगावच्या (03) नगरसेवकांसह, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, सागर आरेकर व नगरसेविका दीक्षा शहारे यांचेसह डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला होता. ते परत घर वापसी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात तेजराम किसन मडावी, देवचंद तरोणे, वंदना किशोर डोंगरवार, शशी विदेश टेंभूर्णे, दीक्षा राजकुमार भगत, कामिनी प्रदीप कोवे, शहीस्ता मतीन शेख या 07 नगरसेवकांचा समावेश आहे.

error: Content is protected !!