आज दानेश भाऊ साखरे मित्रपरिवार तर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
सडक अर्जुनी, दिनांक : 11 मार्च 2024 : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडसिवनी ग्रामपंचायत येथे आज 11 मार्च रोजी दानेश भाऊ साखरे मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ग्रामपंचायत कार्यालय खोडसिवणी यांचे संयुक्त विधमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन आज सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत खोडसिवणी च्या आवारात करण्याचे ठरविले आहे. करिता सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून नेत्रदान शिबिराचे व रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे दाणेज भाऊ साखरे मित्रपरिवार तर्फे जनतेला आव्हान करण्यात आले आहे.
शिबिराचे वैशिष्ट्ये…
• शिबिरात नेत्र तपासणी झालेल्या सर्व गरजु रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येतील.
शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या चमुकडून नेत्र तपासणी करण्यात येईल.
• मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड झालेल्या रुग्णांना निश्चित तारीख देवून त्या दिवशी त्यांचे वर तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाईल.
• शस्त्रक्रिया करीता रुग्णांना जाण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत केली जाईल.
• रुग्णांनी येतांनी सुरु असलेली औषधे व कागदपत्रे व आधार कार्ड सोबत आणावे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. ९८२२०६६६२०
@ दोन फोटो