नमो चषक 2024 कार्यक्रम हास्यजत्रा फेम “शिवाली परब” यांच्या प्रमुख उपस्थिती मधे हा पुरस्कार सोहळा संपन्न
सडक अर्जुनी – नमो चषक २०२४ अंतर्गत विविध क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात करण्यात आले होते. या अंतर्गत विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम क्षेत्रातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आले होते. अनेक महिला आणि पुरुष खेळाडू यांनी अत्यंत उत्स्फूर्थ दिला होता. दिनांक १० मार्च २०२४ रोजी अर्जुनी मोरगाव येथील एस एस जे महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम “शिवाली परब” यांच्या प्रमुख उपस्थिती मधे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी खेळाडूना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष संजयजी भेंडे, खासदार सुनिलजी मेंढे, अँड.येशुलालजी उपराडे, माजी आमदार हेमंतजी पटले, संपर्क प्रमुख वीरेंद्रजी अंजनकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवालीजी परब, जेष्ठ नेते नामदेवजी कापगते, शिवनारायणजी पालीवाल, उमाकांतजी ढेंगे, तालुका भाजपा अध्यक्ष विजयजी कापगते, रचनाताई गहाणे, प्रकाशजी गहाणे,जि.प.सदस्य लायकरामजी भेंडारकर, जे.डी.जगणीत, सडक/अर्जुनी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगाये, सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, उपस्थित होते.