Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


भाजपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे कार्यप्रणालीवर विश्वास.


अर्जुनी मोर.11 मार्च 2024 : सस्थानिक एस. एस. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री राजकुमार बडोले आयोजीत नमो चषक 2024 क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव तथा पारितोषिक वितरण सोहळा 10 मार्च रोजी पार पडला. यामधे काँग्रेस, राष्टवादी काॅग्रेस, तथा शिवसेना शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्ते यांनी भारतिय जनता पक्ष तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे वरिष्ठ नेते महाराष्टाचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांचे कार्यप्रणालीवर विश्वास ठेवुन भाजपामधे प्रवेश घेतला.

अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे भाजपा नेते व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या क्षेत्रात भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजविली आहे. अत्यंत मृदभाषी व शांत स्वभावाचे बडोले साहेब सतत जनतेच्या संपर्कात राहत आहेत. त्यांचे कार्यकतृत्वार विश्वास ठेवुन तालुक्यातील अरततोंडी येथील रहिवासी व झाडीपट्टीतील प्रख्यात नाट्यलेखक तथा राष्टवादी काॅग्रेसचे कार्यकर्ते संजय ठवरे तथा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तथा युवा सामाजिक कार्यकर्ते अश्विनसिंग गौतम तथा मिनाताई शहारे यांचे नेतृत्वात तावसी, निलज येथील अनेक महीला कार्यकर्ते तथा केशोरी परिसरातील प्रकाश गहाणे यांचे नेतृत्वात तथा विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा मधे प्रवेश केला.

सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय भेंडे, खासदार सुनिल मेंढे, अँड. येशुपाल उपराडे ,माजी आमदार हेमंत पटले, संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब, जेष्ठ नेते नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, उमाकांत ढेंगे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, रचनाताई गहाणे, प्रकाश गहाणे, जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, जे.डी. जगणीत, सडक/अर्जुनी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, व अन्य मान्यवरांनी भाजपामधे प्रवेश घेणा-यांचे पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकत वाढली असुन माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हात मजबूत झाले असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.

error: Content is protected !!