आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते गोठणगाव येथे गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन
अर्जुनी मोरगाव –आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगाव अंतर्गत धान्य साठवण्या करिता गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जी. प. उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर , पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, आम्रपाली डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, महिला अध्यक्ष शिशुकला हलमारे,शबरी आदिवासी विकास महामंडळ देवरी येथील व्यवस्थापक प्रफुल पाटील, नवेगाव बांध येथील प्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी,संस्थेचे अध्यक्ष रवी घरत ,गोठणगाव येथील सरपंच संजय ईश्वार, बोंडगाव येथील सरपंच पुष्पाताई डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, पुष्पा डोंगरवार, रामनगर येथील सरपंच संतोष मिर्झा,माजी जी. प.सदस्य रतिराम राणे, संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ मेश्राम,सचिव संतोष चांदेवार ,संचालक कांतीलाल साखरे ,विश्वनाथ कोवें, नारायण हटवार माजी अध्यक्ष सिगू कोवें,कांतीलाल मडावी ,देवराम पूराम, शामराव मडावी, टेकराम मानकर ,रवींद्र लोकडे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की केवळ शेतकऱ्यांनी धान पिकाकडे लक्ष न देता भाजीपाला पीक लागवड ,तसेच फळ बागायत लागवडीकडे वळले पाहिजे .ज्या माध्यमातून अधिक नफा आपल्याला कशाप्रकारे कमवता येईल या बाबीवर विशेष भर दिले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार महोदयांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या संदर्भातील उपाय योजना सुद्धा सुचविल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घरत कर यांनी केले तर संचालन उद्धव मेहंदळे यांनी केले. परिसरातील संस्थेचे सभासद सदस्य व शेतकरी उपस्थित होते.