Saturday, August 23, 2025
अर्जुनी मोर

माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन

अर्जुनी मोरगाव – माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे वाढदिवसाचे निमित्ताचेऔचित्य साधून, राजकुमार बडोले फाउंडेशन यांचे वतीने मौजा केशोरी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
समाजसेवेचे व्रत घेतलेले माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जनतेच्या समस्या निवारण्यासाठी ,त्यांच्या सेवेसाठी सदैव कार्य तत्पर राहण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवत जनहितार्थ कार्य करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवलेले आहे .
त्याचाच एक भाग म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ग्राम केशोरी येथे भगवान बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना अभिवादन करून राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने जनहितार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल होते. याप्रसंगी केशोरी व परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि केशोरीचे अत्यंत धडाडीचे सरपंच नंदकुमार गहाणे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .याप्रसंगी परिसरातील जनतेने उभयतांचे अभिष्टचिंतन करून निरामय जीवन व्यतीत व्हावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्यात.या प्रसंगी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले भारावून गेले व मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपले आयुष्य गोरगरिबांच्या व गरजू लोकांच्या आयुष्यासाठी वाहून देण्यासाठी सदैव तत्पर असून, जेव्हा- जेव्हा संधी मिळेल तेव्हा -तेव्हा जनहितार्थ तत्परता दाखविण्याचे सामर्थ्य सदैव माझ्या मनात घर करून राहील असा आशावाद व्यक्त केला. जनतेने दिलेल्या प्रेमाचा मी सदैव ऋणी आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या कायमस्वरूपी ऋणी असेल, अशा हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्यात.
ह्यप्रसंगी राजहंसजी ढोके सर, प्रकाशभाऊ गहाने, नंदु गहाणे, विजयजी गहाने, खोकन सरकार , सुशीलजी गहाने, घनशामजी शहारे(सरपंच वडेगाव बंध्या), डॉ. जतिन मंडल, विलासजी बोरकर केशोरी, अविनास कापगते, जितेंद्र साळवे, वैभव गहाने, तेजुकलाताई गहाने,
नारायणजी हटवार, मिथुन टेंभुर्णे,श्रीराम शेंडे, रामकृष्ण बनकर, रमेश भजने, विश्वनाथ शेंडे, सचिन घरामी, राजू कावळे, नारायण पाटणकर चीचोली, रेशीम झोडे, लोकचंद पर्वते, आनंदराव कामातकर , किशोर शेंडे, विश्वनाथ कोरेवर, एकनाथ राणे, निखिल गायकवाड राजकुमार बडोले फौंडेशन चे राकेश भास्कर, प्रशांत शहरे, उपस्थित होते.

error: Content is protected !!