Saturday, May 17, 2025
साकोली

बालोद्यानातील झुले परत लावा! , महिला साकोली नगरपरिषदेवर धडकल्या

लहान मुलांचे झोपाळे लावा ; महिला गेल्या साकोली नगरपरिषदेवर

मुख्याधिकारींनी दिले होते आश्वासन ; १२ दिवसही लोटले

आशिष चेडगे / MKM न्यूज 24
साकोली : शहरातील प्रभाग क्र. ०५ मधील अजीतबाबा समाधी चौकातील बालोद्यान व समाजमंदिर परीसरातील १४ मार्चला मुलांच्या बालोद्यानचे झुले काढून येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथे महिलांसह लहान मुलांनीही “झुले परत लावा, आम्हाला झुले पाहिजे” असा आक्रोश केला. नगरपरिषदेत महिला शिष्टमंडळाने चर्चा केली मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी १९ एप्रिल मतदान होऊ द्या लगेच झुले साहित्य लावतो असे आश्वासन दिले परंतु १२ दिवस लोटूनही झुले का नाही लावले यासाठी सोमवार २९ एप्रिलला वार्डातील महिला पुन्हा नगरपरिषदेत धडकल्या व झोपाळे लावा अन्यथा येथे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
शहरातील अजीतबाबा समाधी चौकातील बालोद्यान या सार्वजनिक ठिकाणचे लहान मुलांच्या खेळण्याचे झोपाळे कुणाच्या परवानगीने काढले यावर मागे महिला संतापजनक भूमिकेत होत्या. १६ मार्चला नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचेशी चर्चा झाली यात सीओंनी सांगितले की मतदान दिन १९ एप्रिल होऊ द्या त्वरित झोपाळे लावतो पण १२ दिवस लोटले आणि काहीच सुक्ष्म कारवाई झाली नाही हे बघून पुन्हा महिला नगरपरिषदेत धडकल्या होत्या. आणि येथील झोपाळे साहित्य दोन दिवसात लावा असा अल्टीमेटम दिला, तेथे कम्पाऊंड नको, जशे मुलांचे झोपाळे होते तशीच मोकळ्या जागेत बालोद्यान जैसे थे स्थितीत झोपाळे लावा अशी मागणी केली. तेथील प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे यांनी महिलांची समस्या ऐकून घेत घटनास्थळी येऊन मोका चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिला जनतेची एकच मागणी होती की ४५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या लोकांनी काढलेले बालोद्यान झुले जशे होते तशे येथे दोन दिवसात लावण्यात यावे. अन्यथा साकोली नगरपरिषदेपुढे उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग ५, ६ येथील महिलांनी दिला आहे.

error: Content is protected !!