Saturday, May 17, 2025
सड़क अर्जुनी

कोदामेडी येथिल उपसरपंच प्रविण भिवगडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित

सडक अर्जुनी – तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोदामेडी/के. ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदावरून प्रवीण तेजराम भिवगडे हे अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून पाय उतार झालेले आहेत.
महत्त्वपूर्ण म्हणजे कोदामेडी ग्रामपंचायत येथे सरपंच सहित सदस्यांची संख्या ही ९ (नऊ) असून त्यापैकी उपसरपंच वगळता सर्व सदस्यांनी सडक अर्जुनीचे तहसीलदार यांना 25 एप्रिल 2024 रोजी अविश्वासाची नोटीस दिली.

प्रविण भिवगडे
प्रविण भिवगडे

त्या नोटीसाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी 29 एप्रिल 2024 ला दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन केले. यावेळी पदाधिकार्यांमध्ये सरपंच विनोद पुसाम, ग्रामपंचायत सदस्य रामदास भीवगडे ,निशांत राऊत, अंजुम खान, सुलोचना मुनिश्वर, कामिनी चांदेवार, रोशनी शेलारे व कुसुम तरोणे या सर्व सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आपले मत दर्शविले.

म्हणजे उपसरपंच वगळता सर्वच पदाधिकारी हे अविश्वासाच्या बाजूने होते हे विशेष, आणि महत्त्वाचे म्हणजे उपसरपंच प्रवीण भिवगडे यांनी सभेला दांडी मारली. त्यानंतर तहसीलदार यांनी सभेची कार्यवाही पूर्ण केली संपूर्ण सभा संपेपर्यंत पोलिसांच्या निगराणी मध्ये कार्यवाही शांत पद्धतीने पार पडली.

error: Content is protected !!