Saturday, May 17, 2025
सड़क अर्जुनी

राजकुमार बडोले फाऊंडेशन द्वारे नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सडक अर्जुनी – 19/5/24- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने दिनांक १९ मे २०२४, दुपारी १ वाजता राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात संपन्न झाले. जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ८० जागा पैकी ३६ विद्यार्थी हे अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोर या तालुक्यातील आहेत. या विद्यार्थ्याचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की या विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून, शिस्त लावून स्वतःला घडवलं पाहिजे आणि उच्च शिक्षण घेतल पाहिजे.

यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज आहे व शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी,निशाताई तोडासे,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले, गोंदिया जिल्हा शिक्षक संघ संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर सर, पंचायत समिती सडक अर्जुनीचे उपसभापती शालिंदर कापगते,अर्जुनी/मोर पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे,पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये,वर्षाताई शहारे,माजी सभापती गिरीधर हत्तीमारे,माजी उपसभापती राजेश कठाणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,कोहमारा संरपच प्रतिभाताई भेंडारकर, रंजनाताई भोई,वराठे सर,बोरकर सर,मेश्राम सर,राजेश कडूकर सर, सुरेश अमले सर, सुधीर वाहने सर, राऊत सर, राजकुमार बडोले फाउंडेशन चे प्रशांत शहारे आदी उपस्थित होते आणि मोठया प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शालिंदर कापगते यांनी केले व आभार प्रदर्शन चेतन वडगाये यांनी केले.

error: Content is protected !!