Wednesday, July 2, 2025
सड़क अर्जुनी

कोदामेडी /केसलवाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निशांत राऊत यांची बिनविरोध निवड

सडक अर्जुनी – 10 जून 24- तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोदामेडी/ केसलवाडा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली.
त्यामध्ये दोनदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले निशांत राऊत यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली .
महत्त्वपूर्ण म्हणजे कोदामेडी येथील उपसरपंच यांच्यावर एप्रिल 2024 ला अविश्वास प्रस्ताव एकमताने पारित झाला होता.

त्यामुळे हे पद खाली होते आणि म्हणून उपसरपंच पदाची निवडणुकी घेण्यात आली. ज्याप्रमाणे ९ (नऊ) सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत म्हणून फक्त सर्वानुमते निशांत राऊत यांनीच अर्ज दाखल केले .एकच अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी अध्यासि अधिकारी म्हणून सरपंच विनोद पुसाम, ग्रामसेवक आर. एस. बोरकर, तहसील कार्यालयाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य रामदास भिवगडे, सुलोचना मुनिश्र्वर, रोशनी शेलारे, कामिनी चांदेवार, कुसुम तरोणे ,अंजुम खान इत्यादी ग्रामपंचायत सदस्यासह यावेळी गावकरी मंडळी यांनी निशांत राऊत यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!