माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन
मेंढकी येथील दिलीप सुरेश वरठी यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू.
सडक अर्जुनी :– शेतात काम करीत असतांना वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सडक अर्जुनी तालुक्यातील मेंढकी येथे दुपारचा सूमारास घडली. दिलीप सुरेश वरठी मृतकाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मृत पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिक रीत्या रक्कम दिली आणि वीज पडून मृत्यू झाल्याने शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत तातडीने मिळवून देण्याची हमी दिली.पिडीत कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सडक अर्जुनी तालुक्यातील मेंढकी येथिल दिलीप सुरेश वरठी यांनी गावापासून जवळच असलेल्या शेतात शेतात काम करीत होते. अंदाजे चार वाजताचा पावसाचे वातावरण झाले. याच दरम्यान शेतात विज कोसळली. या घटनेत दिलीप सुरेश वरठी यांचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मृतकांच्या पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदत कार्य तातडीने करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले.