Tuesday, May 13, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विज बिल व इतर सुविधांसाठी निधी द्या, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

सडक अर्जुनी – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी खंडविकास अधिकारी यांना विज बिल व इतर भौतिक सुविधांसंबंधी शाळांना निधी पुरवण्यासाठी केले आदेशित

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया च्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विज बिल भरण्यासाठी व इतर भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली होती.

या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या मागण्यांचा विचार करून व प्राथमिक शाळांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सकारात्मक दृष्टीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व खंडविकास अधिकारी यांना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वीज बिल भरण्यासाठी व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 24 जून,2024 ला पत्र काढून से आदेशित केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना जिवंत ठेवण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी उचललेल्या पावलांचे सर्व वर्गातून कौतुक होत आहे.
श्री किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया यांनी साहेबांचे विशेष आभार मानले आहे.
या संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सडक /अर्जुनीच्या वतीने खंडविकास अधिकारी रविकांत सानप यांना देण्यात आले.
खंडविकास अधिकारी साहेबांनी जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत सकारात्मकता दाखवून तात्काळ संबंधित पत्रावर कार्यवाही करून सर्व ग्रामपंचायत यांना आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!