अवैध रित्या रेतीची तस्करी करणाऱ्यां ट्रॅक्टर वर महसूल विभागाची कारवाई , तीन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा
सडक अर्जुनी – अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे आणि सडक अर्जुनी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने वाळू भरलेल्या तीन ट्रॅक्टर अवैध रित्या वाहतूक करताना पकडले.
ही कारवाही दिनांक 28 जून ला तालुक्यातील पीपरी राका घाटावर झाली. राजकुमार महारू चांदेवार (ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.36-1508 ,राजू मोहन चांदेवार् ट्रॅक्टर क्रमांक ( एम.एच.36- 6473) , आणि योगेश सुरेश चांदेवार यांना बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला.
सर्व चालक मालक साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथील रहिवाशी आहेत. तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आले असून चालक मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई सौंडद चे तलाठी अहमद कुरैशी,मंडळ अधिकारी पुष्पलता जाधव,तलाठी मनोज डोये, यु. डी.रहांगडाले,आशिष रांगारी,मंडळ अधिकारी हेमलता बिसेन,बघेले,वरकडे,तलाठी हर्ष उईके,मौदेकर, कोतवाल सचिन कोरे, बंसोड आदींनी केली.