अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रात आमदारकीची कोण मारणार बाजी..
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आमदारकीची शर्यत जोमात सुरू….
सडक अर्जुनी – (डॉ.सुशील लाडे) – लग्न समारंभात असो की विविध कार्यक्रमात एक गाणं सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेत असते ते म्हणजे “जेव्हा बघशील तू माझ्याकडं मला आमदार झाल्या सारखं वाटतय….”.
बातमीची सूर्वात मजेशीर करण्याचे कारण म्हणजे अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुका जवळ येत आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नवखे नेते आता बाशिंग बांधून आमदार होण्याच्या तयारीला लागले आहेत.
तर काहीना आमदार झाल्याचे स्वप्न पडत आहे. मीच तुमचा 2024 चा आमदार म्हणून स्वतः लोकांच्या समस्या एकण्याचे काम करीत असून मतदारांशी आपले संपर्क साधून किल्ला मजबूत करीत आहेत. छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपली हजेरी लावून आपले जनसंपर्क मजबूत करीत आहेत.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकाश आघाडी आहे. विशेष म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तर आणखी काही नेते मंडळी आपल्या परीने पक्षात उमेदवारी साठी आता पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत. 2009 ला इंजी.राजकुमार बडोले हे भाजप च्या तिकिटावर निवडणूक आले. 2014 ला. सुद्धा भाजप पक्षाने बडोले यांना तिकीट दिली पुन्हा बडोले निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री झाले. तर 2014 ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडून मनोहर चंद्रिकापुरे हे उभे असता त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2019 च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून मनोहर चंद्रिकापुरे यांचा विजय झाला तर राजकुमार बडोले यांना भाजप ने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असता त्यांचा अल्प मताने पराभव झाला.
अवघ्या काही महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकित पुन्हा एकदा जोर लागला आहे. आजी. माजी. आमदार आपल्या कामाला जोमाने लागले आहेत. विविध पक्षाचे नेते मंडळी आणि नवं नवीन नेते सुद्धा अर्जुनी मोर विधान सभा निवडणूक २०२४ च्या रणांगणात उतरणार असून आपल्या कामाला वेगाने लागले आहेत .
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील जनसामान्य लोकांच्या चर्चे मध्ये कोण? कोणत्या पक्षाचे उमेदवार रणांगणात राहू शकतात! यात असे लक्षात येते की,
भाजप कडून राजकुमार बडोले यांचे नाव प्रथम चर्चे दरम्यान घेतले जाते, त्याचप्रमाणे भाजप चे रत्नदीप दहिवले हे सुद्धा तयारीला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) कडे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉ.सुगत चंद्रिकापुरे, जि.प. उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, नगरसेवक दानेश साखरे, इत्यादींची नावे समोर येतात. तर काँग्रेस कडे मोठी यादी असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यात काग्रेस चे जिल्हा अध्यक्ष माजी. आमदार दिलीप बंसोड, राजेश नंदागवळी, डॉ.भारत लाडे, अनिल दहीवले,हरीश बनसोड, निशांत राऊत, सध्यातरी इत्यादींची नावे समोर येत असून आणखी यादी वाढण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाने डॉ.अजय संभाजी लांजेवार हे सुध्दा स्पर्धेत आहेत जो पक्ष त्यांना उमेदवारी देहील त्यांच्या कडून ते रणांगणात येतील. सध्या त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते. अजय लांजेवार निवडणूक लढणार हे मात्र निश्चित आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून मिथुन मेश्राम.
इत्यादींची नावे समोर येत आहे. मात्र प्रत्येक पक्षात आणखी समोरच्या कालावधीत इच्छुकांची संख्या वाढू शकते.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील 2024 ची निवडणूक अत्यंत चुरसीची असणार आहे. आता हे बघण्याचे आहे की, वरिष्ठ पातळीवरील महायुती आणि महा विकाश आघाडी चे नेते काय निर्णय घेतात, कोण कोणते नेते उमेदवार आपल्या परीने तिकीट करिता बाजी मारतात आणि पक्ष श्रेष्ठी कुणाला तिकीट देहून आपली बाजी खेळणार आणि कोण होणार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा 2024 चा आमदार हे बघण्या सारखे असेल.