IPC हा जुना कायदा रद्द तर ,1 जुलै 2024 आज पासून भारतीय न्याय संहिता -2023 (BNS) या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणीस सुरवात
गोंदिया – भारतीय न्याय संहिता – 2023 (BNS) ची अंमलबजावणी आणि नवीन प्रणाली द्वारे गुन्हे दाखल प्रक्रिया सुरू झाल्याबाबत. पोलीस ठाणे दवनीवाडा येथे भा. न्याय.संहिता 2023 (BNS) अंतर्गत पहिल्या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सविस्तर असे असे की, भारतीय दंड संहिता, 1860 (IPC) हा जुना कायदा रद्द करून भारतीय नागरीकांचे हित लक्षात घेऊन देशाचा नवीन कायदा म्हणून भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) 25 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात आला आहे. आज दिनांक 1 जुलै 2024 पासून संपुर्ण देश पातळीवर भारतीय न्याय संहिता -2023 (BNS) या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणीस सुरवात झालेली आहे. ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान संहिता ( IPC ) आता इतिहास जमा झाले आहे.
भारतीय न्याय संहिता – 2023 (BNS) या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील संपुर्ण 16 ठाणे स्तरावर नविन कार्य प्रणालीचे सॉफ्टवेअर अद्यावत करून नवीन प्रणाली द्वारे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रियेस सुरवात झालेली आहे.
भारतीय न्याय संहिता -2023 (BNS) ची अंमलबजावणी अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे दवनिवाडा येथे नवीन सॉफ्टवेअर प्रणाली द्वारे भारतीय न्याय संहिता -2023 (BNS) चे कलम 115(2), 352 प्रमाणे दारूपाणी पिण्यावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ अश्या प्रकरणावरून पहिल्याच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.