Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

डॉ.अजय लांजेवार आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस मध्ये प्रवेश करणार! 

सडक अर्जुनी : – सडक अर्जुनी मध्ये तेजस्विनी लॉन येथे दिनांक 07.07.2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीद्वारे नवनिर्वाचित खासदार सत्कार सोहळा तसेच पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. अजय संभाजी लांजेवार यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे काँग्रेसच्या विशेष गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच गोंदिया जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे चालू असतांना डॉ. अजय लांजेवार काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू होती, शेवटी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला. त्यांच्यासोबतच विविध पक्षाचे पदाधिकारी व अनेको कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, या पक्ष प्रवेशामध्ये कोण-कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? याबाबत अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.

डॉ अजय लांजेवार यांच्यासोबत महायुतीला खिंडार पाडून हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश असल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे.

error: Content is protected !!