राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजय लांजेवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजय लांजेवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सडक अर्जुनी – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले याचे प्रमुख उपस्थितीत सडक अर्जुनी येथे तेजस्विनी लॉन मध्ये काँग्रेस नवनिर्वाचित खासदार सत्कार आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधनीला सुरुवात केलेली आहे. अशातच प्रफुल पटेल यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या जवळपास हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला असून हा प्रफुल पटेल यांना मोठा धक्का समजला जात आहे.
अजय लांजेवार यांनी वंचित कडून 2019 मधे मोरगाव अर्जुनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 25,000 पेक्षा जास्त मतं पडली होती. दरम्यान स्थानिक
पातळीवर त्यांची पकड असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातो आहे.
पत्रकारांशी बोलताना अजय लांजेवार म्हणाले की आपण नाना भाऊ यांना आम्ही महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असावा अशी आमची धारणा होती . नाना भाऊ यांना बहुजन समाजाचा नेतृत्व मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असायला पाहिजे असे आमचे स्वप्न होते त्या स्पणपूर्ती पूर्ण करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.