सडक अर्जुनी – सागवानाची तस्करी करणारे वन विभागाच्या जाळ्यात, कोयलारी येथे कारवाई : सागवान चिरान केले जप्त
सडक अर्जुनी – वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय शेंडा कोयलारी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सागवानाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. प्राप्त माहिती नुसार शेंडा सहवनक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध सागवान तस्करी सुरू असल्याची चर्चा होती.
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर बारीक लक्ष ठेवले. काही लाकूड तस्कर आपल्या घरी सागवान चिरान करीत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी कोयलारी येथील आरोपी निलेश हिरालाल मेश्राम, राधेश्याम अंकुश नेवारे घटेगाव, बाबुदास रामाजी नेवारे (रा. घटेगाव) यांना जंगलातून सागवान तोडून त्याचे चिरान करताना त्यांच्या घरी पकडले.
त्यांच्याकडून ५२ नग०.५२५ घनमीटर सागवान चिरान जप्त केले. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ कायद्या अंतर्गत, आरोपींवर वन गुन्हा क्रमांक १९७५२ / ४९३७८९/०२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे.यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक वर्षा रहिले शेंडा, क्षेत्र सहायक उमेश गोटेफोडे जांभळी दोडके, वनरक्षक दिलीप माहुरे, शालू मेंढे, तिलोत्तमा भेलावे, अक्षय नंदेश्वर जांभळी, संजय चव्हाण, वनमजूर नाजूक मेंढे, लोखंडे शेंडे, खंडाळकर यांनी केली.
“सडक अर्जुनी तालुक्यात अवैधसागवान वृक्षतोड होणार नाही,यासाठी तालुक्यातील सातहीवनक्षेत्रातील वनकर्मचारी रात्रंदिवसजंगलात गस्त करीत असल्याने अवैधसागवान चोरीला आळा बसणार आहे.”
मिथुन तरोणे – वनपरिक्षेत्र अधिकारी,