Wednesday, May 14, 2025
सड़क अर्जुनी

सेफ वॉटर आईजल स्टेशन चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते उद्घाटन

सडक अर्जुनी – येथे आज दिनांक 14 जुलै रोजी
सेफ वॉटर नेटवर्क इंडिया अंतर्गत आईजल स्टेशन चे उद्घाटन तेजस्विनी लांन जवळ आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश कशिवार,माजी जी . प सदस्य रमेश चूरहे,नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे,  मंजुताई चंद्रिकापुरे , नगरसेवक,  महेश सूर्यवंशी,  डॉ.सुशिल लाडे, शाहिद पटेल, प्रा.राजकुमार भगत, बिरला गणविर, महेश डुंभरे,कंपनीचे फील्ड एक्झिकेक्टिव्ह जयेश परडकर, क्लस्टर कोऑर्डिनेटर जितेंद्र लोकवाणी, फिल्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रवींद्र निपाने, टेक्निशियन आशिष मदारकर,फील्ड अक्झिकेटीव पराग कोल्हटकर, इंजि. लांजेवार, इंजि. कापगते,  इंजि,भागवत झिंगरे, आदिल शेख,निखिल मडावी जोत्सणा मडावी, नितेश गुप्ता,युनुस भाई शेख, जगेस्वर पटोले, तारा मडावी, आरती मडावी,नंदा सूर्यवंशी,माधुरी सूर्यवंशी,तसेच नगर पंचायत कर्मचारी ,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सडक अर्जुनी येथे लावण्यात आलेल्या सेफ वॉटर आइजल स्टेशन अंतर्गत पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पिण्याचे पाणी नागरिकांना मिळणार आहे तसेच एटीएम कार्ड सिस्टमने पाण्याची सुविधा नागरिकांसाठी पुरविली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टीने योग्य स्पर्श रहित शुद्ध पाणी या सुविधेच्या माध्यमातून शहर वाशीयांना तसेच परिसरातील नागरिकांना मिळणार.

error: Content is protected !!