नगर पंचायत सडक अर्जुनी चा अजब कारनामा – कित्येक वर्षे झाली अजून बाजार चौक मध्ये रोडच नाही, साहेब.. रोड होणार तरी केव्हा हो !
सडक अर्जुनी (संपादकीय) – सडक अर्जुनी ग्रामपंचायत चे रूपांतर फेब्रुवारी 2015 मध्ये नगरपंचायत मध्ये झाले. नगरपंचायत होऊन आता पदाधिकाऱ्यांचा दुसरी रेजिम सुरू आहे. अर्थात शासनाला असे वाटले की जी तालुका आहे पण ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत चे नगरपंचायत केले असता नगराच्या विकास हा गतीने होणार आणि नगरातील नागरिकांना मुबलक सुख सुविधा मिळणार. याच हेतूने सडक अर्जुनी ग्रामपंचायत चे प्रमोशन होऊन 2015 मध्ये नगरपंचायत सडक अर्जुनी झाले खरे.
या नगराच्या सुरवातीला स्वागत बोर्ड लावला आहे की, (Welcome to Sadak Arjuni) आणि मध्ये भागी (आपली प्रिय सडक अर्जुनी ) दोन्ही स्वागत बोर्ड बघितले की आवागमन करणाऱ्यांना वाटत असणार खूपच सुंदर आणि वेरी गूड नगर पंचायत असणार सडक अर्जुनी नाही का!

त्यांना काय माहित की कित्येक दशका पासून बाजार चौक मध्ये समोर च्या भागात राहणाऱ्या लोकांना आवागमन करिता कित्येक वर्षापासून अजून रोडच नाही. शासनाच्या बाकीच्या योजने पासून ते वंचित आहेतच.
काही कालावधी पूर्वी अंदाजे ३ ते ३.५ वर्षा पूर्वी खडीकरण झाले होते. मात्र तेही आता पावसाळ्यात उखडले आहे. आणि या ठिकाणी पाऊस आला की चिखल निर्माण होत असतो. ह्या चिकलातूनाच मार्ग काढत येथील नागरिक, शालेय मुले, सिनियर सिटिझन, आवागमन करीत असतात.
ह्याच ठिकाणी चिकलामध्ये शनिवार चा आठवडी बाजार भरत असतो. सर्वांना दिसत आहे परंतु कुणीही ह्या समस्या बद्दल बोलायला तयार नाही. चूप चाप राहून सुशिक्षित असून सुद्धा डोळे बंद करून चिखलामधून बाजाराला येतात आणि स्वतःला चीखला मधून सावरत बाजार करीत असतात.
सांगायचे म्हणजे,
शासनाकडून करोडो रूपये नगराच्या विकास कामे करिता येतात. उद्देश एकच नागरिकांना उत्तम सुविधा,त्यात आरोग्य, रोड रस्ते, नाल्या, शौचालय आणि विविध प्रकारच्या सुख सुविधा मिळायला हव्या म्हणून. चर्चे दरम्यान एक सुजाण नागरिक बोलताना म्हणाला की ,(स्मशान भूमी मे मुर्दो को लेजा ने के लिय लाखो रूपये का रोड बना हैं, अच्छी बात है.., लेकीन साहब जरा य तो बताए जहा जिंदा लोग रहते है वहा रोड अभितक नहीं बनाया गया। ) त्यांच् म्हणणं अगदी खर होते. प्रत्येक वॉर्ड मध्ये रोड बनले इथे का बरं नाही काय कारणं असेल.

या बद्दल थोडी माहिती घेतली असता काही लोकांनी दिलेल्या माहिती अनुसार मागल्या रेजीम मध्येच बाजार चौक (जुने वॉर्ड क्रमांक ४), आता मात्र वॉर्ड क्रमांक ७ मध्ये बाजार चौक येथील समोरील रस्ता अर्थात( छन्नू साखरे ते मेमन मोबाईल वाली गली) रोड साठी मंजूर झाल्याचे सांगितले जाते.
मागील कार्यकाळा पासून तर आज पर्यंत कित्येक रोड ,रस्ते नाल्या, आणि इतर प्रोजेक्ट झाले असतील. परंतु वॉर्ड क्रमांक ७ बाजार चौक येथे अंदाजे ३ वर्षा पूर्वी फक्त साधे खडीकरण झाले होते. आता कित्येक महिने लोटले असतील तरी सुद्धा सिमेंट रोड का बर झालं नाही हा मात्र चिंतनाचा विषय आहे. या वॉर्डातील नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून च प्रवास करावा लागतो. आता सध्या पावसाळा सुरू आहे थोडा पाणी आला की जागो जागी बाजाराचे ओटे असल्या मुळे पाणी साचत असतो.
बाजार चौक मध्ये सुजाण नागरिक आहेत त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे. हे रोजच ह्या वातावरणातून जात असतात. परंतु त्यांना कदाचित हा वातावरण आवडत असेल म्हणून कुणी काही बोलत नसेल कदाचित. साधा प्रश्न विचारु शकत नाही की, कित्येक वॉर्ड मध्ये सिमेंट रोड बनले, नवीन लेआऊट मध्ये रोड बनले, काही ठिकाणी दुरुस्ती म्हणून डबल रोड बनले, परंतु बाजार चौक मध्ये समोरील भागात अजून पर्यंत म्हणजे ७० ये ८० वर्षा पासून लोकवस्ती आहे खूप जुनी वस्ती असून सुद्धा का बरं पक्का रोड झाला नाही ? इतर सुविधा नाहीच ,कदाचित त्यांना नगरपंचायत ची भीती तर लागत नसेल ना ? असे म्हणायला वाहावे होणार नाही. काही महिन्यांपूर्वी आमदार महोदयांनी बाजार चौक मध्ये कामाचे भूमिपूजन केले होते हे विशेष.
सडक अर्जुनी चे नगराध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी बाजार चौक वॉर्ड क्रमांक ७ येथील नागरिकांची समस्या बघता ,मागणी म्हणून सिमेंट रोड चे काम करावे जेणे करून नागरिकांना चिखलातून जान्या पासून सुटका मिळेल.
काही महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष यांना रोड विषयी विचारणा केली असता त्यांनी बाजार चौक येथे समोर लवकरच पक्का रोड आणि गट्टू लावणे चे काम सुरु होईल असे सांगितले होते. परंतु ते काम आता पर्यंत सुरू झाले नाही हे विशेष.
ह्या प्रकरणा बद्दल नगरपंचायत चे प्र.मुख्याधिकारी राज घोडगे यांना MKM NEWS 24 ने मोबाईल द्वारे विचारणा केली असता त्यांनी ह्या बद्दल मला काही माहीत नाही, संपूर्ण माहिती घेऊन कळवतो असे सांगितले.
————
Coming soon – नगरपंचायत ची विकास कामे पदाधिकारी आणि कंत्राटदार