Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

बाजार चौकातील रेती ची डम्पिंग (साठा) कुणाचा, तालुक्यातील रेती घाट तर बंद आहेत!

सडक अर्जुनी – (डॉ.सुशिल लाडे) – सडक अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण रेती घाट सध्या बंद आहेत. रेती घाट लिलाव करून करोडो रुपयाचा महसूल हा शासनाच्या तिजोरीत जमा केला जातो. एकीकडे रेती घाट लिलाव नसल्यामुळे घरकुल, खाजगी व्यक्ती यांना बांधकामाचा प्रश्न निर्माण होतो.

सध्या तरी तालुक्यातील संपूर्ण रेती घाट बंद असून मोठ्या प्रमाणात रेती ची तस्करी केली जाते. कित्येकदा महसूल विभागाच्या वतीने रेती ची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाही केली आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात तालुक्यात रेती ची तस्करी सुरूच आहे. बैल बंडी वाले सुद्धा अवैध रेती वाहतूक करून लाखो रुपयाचे बनलेले सिमेंट रोडची ऐसी तैसी करतच असतात.

सध्या सडक अर्जुनी नगरपंचायत मध्ये नगरातील प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाले आहेत. शासकीय नियमा प्रमाणे प्रत्येक कामाला नियमाचे बंधन आहे. बांधकाम करताना लागणारे मटेरियल मध्ये त्यात लोखंडी सलाख ,सिमेंट, आणि मुख्यतः वाळू हे मोठ्या प्रमाणात लागत असते. शासकीय काम म्हटले की वाळू ची रॉयल्टी आलीच बगैर रॉयल्टी चा शासकीय कामात वापर म्हणजे शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावणे आहे. (नंतर वाळू च्या रॉयल्टी चे पैसे बांध कामा प्रमाणे बिला मधून कपात करणे हा भाग वेगळा.). प्रश्न हा आहे की शासकीय कामाला लागणारी वाळू ही रॉयल्टी ची बिना रॉयल्टी ची याची चौकशी होत असते काय?.

सडक अर्जुनी नगरपंचायत बाजार चौक येथे वॉर्ड क्रमांक ७ मध्ये दि .१६ जुलै २०२४ पर्यंत अंदाजे ७ ये ८ ट्रॅकर वाळूची डम्पिंग (साठा) करण्यात आला होता. आज मात्र १७ जुलै  रोजी  त्या डम्पिंग मधील वाळूचा साठा हा कमी दिसत आहे.

बाजारचौक वॉर्ड क्रमांक ७ मधील डम्पिंग केलेली वाळू
बाजारचौक वॉर्ड क्रमांक ७ मधील डम्पिंग केलेली वाळू
बाजारचौक वॉर्ड क्रमांक ७ मधील डम्पिंग केलेली वाळू
बाजारचौक वॉर्ड क्रमांक ७ मधील डम्पिंग केलेली वाळू

हा वाळूचा साठा कुणाचा आहे, कुठल्या घाटातील वाळू आहे ,त्या वाळूची रॉयल्टी नियमा प्रमाणे आहे काय? तालुक्यातील रेती घाट बंद असताना अवैध रित्या तर वाळू आणली गेली तर नाही ना, कुठल्या कामासाठी हि वाळू आणल्या गेली, त्या डम्पिंग वाळूची रॉयल्टी याची संपूर्ण चौकशी महसूल विभागाच्या वतीने करणे आवश्यक आहे.

दिनांक 16 जुलै रोजी अज्ञात एका नगरसेविका यांचे पतिदेव mkm news 24 कडे एका कंत्राटदारांची तक्रार घेऊन आले असता त्यांचे म्हणणे होते की, तो सदर कंत्राटदार नगरसेविका यांचे म्हणणे यैकून घेत नाही आणि आपले मंन मर्जिने कामे करतो त्याची बातमी प्रकाशित करा म्हणून , नियमा प्रमाणे आम्ही म्हणालो लिखित स्वरूपात तक्रार घ्यावे आम्ही बातमी प्रकाशित करू. सदर नगरसेविका यांचे पतीदेव ठीक आहे असे बोलून निघून गेले.

शासकीय कामाला नियमाचे बंधन आहे. सर्व नियमांना धाब्यावर बसवून आपल्या मन मर्जीने सडक अर्जुनी नगरपंचायत मध्ये काम करणारे कंत्राटदार काम करीत असतात. जे कामे मंजूर झाले असतील ते काम करीत असताना सुरवातीलाच त्या कामाचा बोर्ड दर्शनी भागात लाहून त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. परंतु कित्येकदा  कंत्राटदार काम करीत असताना कामाचा बोर्ड लावीत नसल्याचे चित्र आहे. कदाचित ते नागरिकांना मूर्ख समजत असणार अथवा कदाचित त्यांना भीती असणार की सदर काम हा उदा. १० लाखाचा आहे असे नागरिकांना दिसणार तर नागरिक प्रश्न विचारु शकतात की, हा एवढ्याशा काम १० लाख रू. चा का म्हणून. आणि कामाची क्वालिटी दिसून येणार म्हणून ते बोर्ड लावीत नाही कदाचित. याकडे नगरसेवकांनी जातीने लक्ष दिले पाहिजे.

सडक अर्जुनी नगरपंचायत मध्ये कामा करिता सद्या ठेकेदारांची गर्दी वाढली आहे. काही व्यक्ती कामे मिळविण्यासाठी काही नगर सेवकांसी जवळीकता साधत  असतात. असू द्या तो त्यांचा वयक्तिक विषय आहे कदाचित त्यांचे सुंदर आणि उच्च विचार त्यांना प्रभावित करीत असावेत.

सूत्रा नुसार नगरातील सुजाण नागरिकांन मध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे की काही सदर अज्ञात व्यक्तींनी नगर पंचायत च्या कामा बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले असता.. त्यांना ही त्यांचे तोंड बंद करण्यासाठी काही कामे वाटल्या गेली असल्याने बोलले जाते म्हणजे “तेरी भी चूप मेरी भी चूप” , नंतर त्या सदर अज्ञात व्यक्तींनी  ती कामे कुणाला तरी विकली ! अशी जनमानसात चर्चा आहे! ,यात किती सत्यता आहे याचे प्रमाणीकरण MKM news 24 करीत नाही.

नगरातील सुजाण नागरिकांची मागणी आहे की, शासनाने करोडो रुपये निधी हा नगराचा विकास आणि जनतेच्या सुविधे करिता दिले आहेत. ज्या वार्ड मध्ये विकास कामे करणे आहे त्या प्रभागाचे काम करीत असताना नियम धाब्यावर बसवून काम न करता त्या कामाचे इस्टिमेट अनुसार आणि नियमा प्रमाणे कामे करावे या करिता नगरपंचायत ने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.


टीप – सदर बातमी जन हितार्थ प्रकाशित केल्या गेली आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे , पत्रकाराने आपले कार्य केले आहे. कुणीही व्यक्ती स्वतःवर घेऊ नये.

error: Content is protected !!