विधानसभा निवडणुकीचे वारे लागले वाहू , कोण होणार आमदार! जुने की नवीन चेहरा
सडक अर्जुनी – (डॉ.सुशिल लाडे)- सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन पडल्या आहेत. सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागणार आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी जोमात सुरू केली आहे. सर्व पक्षात भावी उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत. आजी माजी आमदार, आणि दावेदार उमेदवारांचे सुद्धा विधानसभा क्षेत्रात गावो गावी जाहून बूथ बैठका घेणे सुरू आहे.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जाती करिता राखीव असून दोन टर्म भाजप चे राजकुमार बडोले हे आमदार राहिले असून ते कॅबिनेट मंत्री सुद्धा राहीले आहेत तर राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचा भावी आमदार कोण होणार याची शर्यत आता सुरू झाली निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जागा वाटपाचा कार्यक्रम निश्चित झाले नसले तरी सर्व पक्षीय भावी उमेदवार रणांगणाची मोठ्या ताकतीने तयारी करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे जी.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांची सुद्धा जोरदार तयारी दिसत आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते डॉ.अजय संभाजी लांजेवार यांची काँग्रेस मध्ये धडाकेबाज एन्ट्री झाली. अजय लांजेवार सुद्धा मोठ्या ताकतीने क्षेत्रातील गावो गावी जाहुन भेटी देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक दानेश साखरे यांनी अल्पकालावधी मध्ये आपला वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला. जनमानसात चर्चा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस चे काही कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याचे कळताच दानेस साखरे यांनी आपला पक्ष न सोडण्याचा विनंती करताना व्हिडिओ समाज माध्यमावर घातला असता पक्षात त्यांची एक वेगळीच जागा निर्माण केली असल्याचे बोलले जाते. साखरे सुध्दा जोमात तयारीला लागले आहेत.
अर्थात सध्याची परिस्थिती बघता लोक चर्चे मधून भावी उमेदवारांची यादी पाहता भाजप कडून राजकुमार बडोले, रत्नदीप दहीवलें, काँग्रेस कडून दिलीप बनसोड, डॉ.अजय लांजेवार, राजेश नंदागवळी, डॉ.भारत लाडे, अनिल दहिवले,निशांत राऊत, हरीश बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस कडून मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत गणवीर ,डॉ. सूगत चंद्रिकापुरें, दानेश साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) मिथुन मेश्राम इत्यादींची नावे सध्याची परिस्थिती बघता समोर येत आहे मात्र आणखी भविष्यात सर्व पक्षीय उमेदवारांची यादी वाढण्याची दाट शक्यता आहे.
ज्या ज्या प्रमाणे कॅलेंडर ची तारीख बदलते आणि निवडणुकीचे दिवस जवळ येत जातात त्या त्या प्रमाणे भावी उमेदवार आणखी ताकतीने जनसंपर्क मजबूत करण्यासाठी लागले आहेत.
विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना दुसऱ्यांदा आमदार बनण्याची इच्छा असली तरी वोटर हा राजा असतो.चंद्रिकापुरे यांच्या कामाची पावती म्हणून त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल काय?. ते कितपत जनतेच्या मनात आपली जागा आणखी निर्माण करतात हे भविष्यात कडेलं.
त्याच प्रमाणे माजी मंत्री राजकुमार बडोले हे एकदा आमदार तर दुसऱ्याचा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. 2019 चा चूनाव हा अत्यंत अल्प मताने हरल्या मुळे त्यांची तिसऱ्यांदा ह्याट्रिक चुकली. तरीसुद्धा बडोले हे गेल्या पाच वर्षा पासून आपले जनसंपर्क टिकवून ठेवले असून ते पूर्ण ताकतीने आणखी मजबूत केले आहे व त्यांनी आपली जागा जनतेच्या मनात किती निर्माण केली आहे हे सुद्धा येणाऱ्या काळात कडेल.
इकडे डॉ.अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्या मुळे हे सुध्दा निवडणूक लडणार असे संकेत दिसत आहेत. डॉ.अजय लांजेवार यांनी जरी म्हटले असेल की, मी उमेदवारी साठी आलो नाही वैगेरे…. !? परंतु ” ये पब्लिक है ये सब जानती है।. डॉ.लांजेवार यांचे बूथ बैठका घेणे सुरू असून त्यांचा दांगडा जनसंपर्क आहे.
सर्व पक्षीय भावी उमेदवार हे कंबर कसून तयारीला लागले आहेत. काही नवखे उमेदवारही या वेळेस आमदार होण्याचे स्वप्न बघत मैदानात उतरणार आहेत.सध्याचे वातावरण बघता असे दिसून येते की, निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. जनतेचा मत रुपी आशीर्वाद हा कुणाच्या पदरात जास्त पडतो हे पाहण्यासारखे असेल.
2024 चा अर्जुनी मोर विधानसभा चुनाव हा अटीतटीचा होणार हे मात्र नक्की.