Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

क्षतीग्रस्त पीक व घरांचे पंचनामे करून भरपाई दया – मिथुन मेश्राम 

अर्जुनी मोर –गत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून पीडितांना तात्काळ नुकसान भरपाई दया अशी मागणी गोंदिया जिल्हा राका.(शरद पवार) गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.यंदाच्या खरीप हंगामात मागील काही दिवसात झालेला पुरेसा पाऊस व विविध सिंचन सुविधा अंतर्गत विविध पीक लागवड करण्यात आली आहे.

हजारों रुपये शेत मशागत व पीक पेरणीसाठी खर्च करून शेतकऱ्यांनी पिकांची नुकतीच लागवड पूर्ण केली होती. तथापि मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेवून शेत पिकांची लागवड केल्याची माहिती आहे. मात्र गत दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतीवरुष्टी झाली.या अतीवरुष्टिमुळे नुकतेच लागवड झालेली विविध खरीप पिके पाण्याखाली बुडाली आहेत.

तरअनेकांच्या राहत्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याची ओरड आहे. ऐन पावसाळ्यात अनेकांची राहते घर पडल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत.तर हजारो रुपये खर्चून लागवड केलेली खरीप पिके पाण्याखाली बुडाल्याने सदर पिके पुर्णतः नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत शासनाच्या आपत्ती निवारण विभागाने तात्काळ दाखल घेवून अती व्रुष्टीमुळे बाधित शेत पिके व घरांचे नुकसान प्रकरणी तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे करून पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!