Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – दानेश साखरे

अर्जुनी मोरगाव – गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीसह जोरदार पाऊस सुरु आहे त्यामुळे तालुक्यातील बाराभाटी येथील तलाव फुटल्याने ५० एकरातील धान पिक असलेल्या शेतात शिरलं पाणी.परिणामी नुकतेच रोवणी झालेलेले भात पिकसडले, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झालेआहे. याचा फटका गावातील शेकडो शेतकऱ्यांना पडला असून कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करावा,बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यां समोर आहे. शेतकऱ्यांनी आपली व्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष तथा नगरसेवक दानेश साखरे यांच्याकडे मांडली. त्यांनी प्रशासनाने या प्रकरणीलक्ष घालून तातडीने फुटलेलं तलाव बांधकामकरून द्यावा, तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी केली आहे.

संपूर्ण सत्तावीस एकरामध्ये पसरलेला हा तलाव,या तलावाच्या आधारे शेतीला सिंचन करण्याचेही काम केलं जातं. पावसाने दडी दिल्यास तलावाच्या आधारे शेतकरी आपली शेती पिकवतात. मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव फुटला आणि संपूर्ण पाणी शेजारी असलेल्या भात शेतीमध्ये गेले आहे.

शेतकऱ्यांनी नुकताच रोवनी केलेल भातपीक संपूर्णतः नासधूस आणि सडले आहे. अजूनही पाणी शेतामध्ये साचून असल्यामुळे आता दुबार रोणीचं संकट या शेतकऱ्यांवर आलेला आहे.त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचानामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी दानेश साखरे यांनी केली आहे. यावेळी शालीकराम हातझाडे.आर. के. जांभूळकर व पिडीत शेतकरी मोठ्या.संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!