धानाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांना द्या : माजी मंत्री बडोले
सडक अर्जुनी : जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातू नरब्बी हंगामात शेतकऱ्यांचे धान आधारभूत किंमतीमध्ये खरेदी करण्यात आले. मात्र दोन महिन्याचा काळ लोटूनही शेतकऱ्यांचे चुकारे थकविण्यात आले आहे.
अलीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यास अनेक भानगडी निर्माण करीत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे थकलेले चुकारे त्वरित अदा करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पणन महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
खरीप हंगामाला सुरुवातझाली आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक असो की, राष्ट्रीयकृत बँकचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत.तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील खर्च कसा भागवावा,असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे थकलेले चुकारे त्वरित अदा करण्यात यावी, अशी मागणी इंजी. राजकुमार बडोले यांनी केली आहे.