नगर पंचायत च्या त्या झालेल्या कामाची दुसऱ्यांदा निविदा अखेर रद्द होणार..!
*नगर पंचायत च्या त्या झालेल्या कामाची दुसऱ्यांदा निविदा अखेर रद्द..!
*MKM NEWS 24 ने त्या नाली बांधकाम प्रकरणाची फोडली वाचा.
*सडक अर्जुनी च्या मुख्याधिकारी यांनी लगेच घेतली दखल.! काय आहे नेमके प्रकरण!
सडक अर्जुनी ( डॉ.सुशिल लाडे) – नगरपंचायत सडक अर्जुनी येथे करोडो रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. सडक अर्जुनी नगर पंचायत सध्या तरक्की वर आहे. ज्या धूम धडाक्यात विकास कामे होत असतात त्या कडे अधिकारी आणि पदाधिकारी यांचे लक्ष असते काय? असा सवाल सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर असे की, दिनांक १६/७/२०२४ ला नगरपंचायत सडक अर्जुनी ने एक निविदा सूचना काढली होती. त्या निविदा सूचना प्रमाणे (निविदा सूचना क्र 206/बांधकाम 2024) नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजना सन 2023-24 , महाराष्ट्र नगरोत्थान महाअभीयान योजना सन 2023-24 आणि अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती नागरी सुधार योजना सन 2023-24 नुसार एकूण 13 कामाची निविदा द्वी पद्धतीत मागविण्याची निविदा सूचना पत्रक काढले होते.
दिनांक 23 जुलै 2024 रोजी ला MKM NEWS 24 चे मुख्य संपादक डॉ.सुशिल लाडे हे खाजगी कामा निम्मित नगर पंचायत कार्यालयात गेले असता. त्यांनी नगरपंचायत चे कर्मचारी नंदू गहाने यांना सहज पणे विचारणा केली की, काही विकास कामांची निविदा वगैरे नगरपंचायत द्वारे आणखी प्रसिद्ध होणार आहेत की काय? वगैरे.
नगर पंचायत चे कर्मचारी नंदू गहाने यांनी दिनांक 16/7/2024 ची निविदा पत्रक दाखवली की, ही विकास कामे होणार आहेत आणि निविदा सूचना लावलेली आहे. मुख्य संपादक डॉ.सुशिल लाडे यांनी ती प्रसिद्ध निविदा पत्रक पडताळून बघीतली असता त्यांच्या लक्षात आले की, (13) क्रमांकात असलेले नाली बांधकाम फक्त नाव चेंज करून ( प्रभाग क्रमांक 7 मंगल शेंडे ते (मालन डोंगरे ऐवजी) ताहिर शेख यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकाम) असे होते.
सांगायचे म्हणजे (मंगल शेंडे ते मालन डोंगरे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकाम ) हे नुकताच झालेले आहे. आणि हे बांधकाम वैशिष्य पूर्ण कामासाठी विशेष अनुदान सन 2023/24 अनुसार आहे. तसे फलक झालेल्या नाली बांधकाम परिसरात लावल्या गेले आहे. त्या बोर्ड वर सुद्धा चुकीच्या पद्धतीने माहिती लिहिल्या गेली असून असे निदर्शनास दिसून येते. नंतर त्या बोर्ड वर दुरुस्ती झाली की नाही तर ते आम्हाला माहीत नाही.
उदा – प्रभाग क्रमांक 6 नसून तो प्रभाग क्रमांक 7 आहे. आणि इतर जे काही असेल ते..!?.
विशेष म्हणजे खरा प्रश्न हा आहे की, सदर काम झालेला असून पुन्हा त्याच कामाचा उल्लेख असलेले म्हणजे लोकेशन तेच कामे तेच फक्त नाव चेंज करून ( प्रभाग क्रमांक 7 मंगल शेंडे ते (मालन डोंगरे ऐवजी) ताहिर शेख यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकाम) असलेले निविदा दिनांक (निविदा सूचना क्र 206/बांधकाम 2024) नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजना सन 2023-24 , महाराष्ट्र नगरोत्थान महाअभीयान योजना सन 2023-24 आणि अण्णा भाऊ साठे दलीत वस्ती नागरी सुधार योजना सन 2023-24 नुसार एकूण 13 कामाची निविदा द्वी पद्धतीत मागविण्याची निविदा सूचना पत्रक काढले होते.
त्याच्यात 13 नंबर चे कामाचा उल्लेख केला होता. ह्या बद्दल नंदू गहाने यांना विचारणा केली असता त्यांनी लगेच संबंधित , पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी मोबाईल द्वारे बोलणी केली असता त्यांनी ती चूक मान्य करून झालेल्या कामाची पुन्हा निविदा मागवू नये अशा सूचना केल्या असल्याचे सांगितले. आणि पत्रकाराचे आभार व्यक्त केले.
प्रश्न इथेच संपत नसून इथून खरा प्रश्न सुरू होत आहे. की, निविदा काढताना पूर्ण माहिती घेतली जात नाही काय?, अधिकारी त्या कामाच्या जागेवर लोकेशन वर स्वतः जात नाही काय? जे बांधकाम करायचे आहे नगर विकास विभाग शासन निर्णय 8-2-2011 मधील अट क्रं. 1 नुसार त्यां कामाची पूर्वीची फोटो आणि नंतर ची फोटो काढणे अनिवार्य असताना सुद्धा नगर पंचायत फोटो काढत नाही काय?. जर फोटो काढले असतील तर ते दुसरी निविदा देताना पडताळणी करीत नाही काय? असे कित्येक प्रश्न निर्माण होत आहेत!?.
मानले की, झालेले कामे पुन्हा निविदा काढून करायचे आणि चूक लक्ष्यात येताच ते काम रद्द (कॅन्सल ) करता आले असले तरी पदाधिकारी आणि अधिकारी यांचे कामावर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होताना दिसतात.
सुजाण नागरिकांचा प्रश्न आहे की ज्या प्रभागात विकास कामे झालेले आहेत नियमा प्रमाणे कामे सुरू होण्या पूर्वीच त्या कामाचे फलक लावायला पाहिजे. कंत्राटदाराने कित्येक प्रभागात कामाचा माहिती फलक हा अजून पर्यंत लावलेला नाही. हा कंत्राटदारांचा मनमर्जी पणा नाही काय?.
नागरिकांना माहिती असायला हवी की, त्यांच्या प्रभागात कुठली कामे, कुठल्या वर्षी, किती रुपयाचे कामे, कुठल्या योजनेतून, कोण कंत्राटदार आहे , कुठून कुठपर्यंत . आणि नियमा प्रमाणे जे कामाचे माहिती लावायला पाहिजे ते लावले जात नाही तर त्याला कांत्रादराची होषियारी म्हणायची की आणखी काय !?. अशा मनमर्जी कामे करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालायला पाहिजे.
नगर पंचायत चे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.
राज घोडगे मुख्याधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी
” झालेल्या कामाची निविदा मागवू नये अशा सूचना दिल्या गेल्या.” ते काम रद्द करण्यात येणार!. तसेच कंत्राटदाराने कामाच्या जागेवर कामे सुरू होण्यापूर्वी इस्टिमेट प्रमाने कामाचा माहिती फलक (बोर्ड) लावणे अनिवार्य आहे . कंत्राटदारांना त्या बोर्डाचे 17000 हजार रुपये मिळतात”.
(टीप – सत्यता दाखवणे हे पत्रकाराचे काम आहे यात कोणीही पदाधिकारी, अधिकारी ,कर्मचारी, कंत्राटदार यांनी नाराज होण्याचे कारण नाही.)