Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

गॅस हंड्याच्या स्फोटामुळे घर झाले उद्ध्वस्त पिड़ीत कुटुंबीयांना अजय लांजेवार यांनी दिली भेट

अर्जुनी मोरगाव – MKM NEWS 24 –गोंदिया जिल्हा अर्जुनी मोर तालुक्यातील खामखुरा या गावी गॅस हंड्याच्या स्फोटामुळे माधव काशीराम नेवारे यांचे घर जळुन राख झाल्याची घटना घडली. इंडियन गॅस एजन्सी कडून गॅस हंडा घेतल्यानंतर चहा बनवण्यासाठी गॅसचा वापर करताना अचानक स्फोट झाला. संपूर्ण घर जळुन खाक झाले. मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडली असल्यामुळे घरात असलेल्या सदस्यांना बाहेर पडण्याची सोय झाली.

कसलीही जीवित हानी झाली नाही. घरात असलेले कडधान्य जीवनाशक वस्तू ,पैसा, जळुन नष्ट झाल्यामुळे माधव निवारे यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली.संकटाच्या वेळी शासनाकडुन मदत मिळाली नाही. माहिती कळताच अजय लांजेवार यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली व जीवनावश्यक वस्तू स्वरूपात त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. याप्रसंगी गावातील नागरिक, अरविंद मिसार, शंकर भाऊ मेंढे, दिवाकर भाऊ चुटे, प्रदीप सहारे, किशोर सहारे, उपस्थित होते.

error: Content is protected !!